Mahesh Landge News : महेश लांडगेंचं पिंपरी-चिंचवडकरांना दुसरं मोठं 'गिफ्ट!'; थेट टेंडरही निघालं...

Pimpri Chinchwad Court : न्यायालयाच्या नऊ मजली इमारतीसाठी ४२८ कोटींचा खर्च
Mahesh Landge
Mahesh LandgeSarkarnama

Pune News : पिंपरी-चिंचवडचे कोर्ट हे १९८९ ला सुरु झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे ३४ वर्षांपासून भाड्याच्या व अपुऱ्या जागेत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी येथे २००८ मध्ये १६ एकर जागा विलीनीकरण होण्यापूर्वी दिली होती. मात्र, राजकीय इच्छाशक्ती आणि निधीअभावी तेथे १५ वर्षानंतरही एक वीट रचली गेली नव्हती. अखेरीस आता पहिल्या टप्प्याचे टेंडर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहे. यामुळे शहर न्यायालय स्वतःच्या प्रशस्थ जागेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Political News)

उद्योगनगरीला पाणीपुरवठा करण्यासाठी मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंद जलवाहितीतून पाणी आणण्याच्या कामाला १२ वर्षांपूर्वी स्थगिती मिळाली होती. ती भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या पाठपुराव्यामुळे नुकतीच राज्य सरकारने उठवली. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या प्रयत्नांना भक्कम पाठबळ दिल्याने शहराला आता ही दुसरी गुड न्यूज मिळाली आहे. त्याबद्दल ‘व्हीजन- २०२०’ मधील आणखी एका स्वप्नाची पूर्ती झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Mahesh Landge
Bhagirath Bhalke News : 'आता अंत्ययात्रा, तर मतपेटीतून दहावा करा!'; मराठा आरक्षणासाठी भगिरथ भालके आक्रमक

'पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काची न्यायालय इमारत दृष्टीक्षेपात आल्याची बाब निश्चित समाधानाची आहे,' असे ते म्हणाले. त्यांच्याच मतदारसंघात होणाऱ्या या न्याय संकुलाचे भूमीपूजन नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. या संकुलात जिल्हा न्यायालयही असल्याने त्यासाठी चिंचवडकरांची पुण्याला होणारी पायपीट थांबणार आहे.

चार जिल्हा न्यायालये, ११ जेएमएफसी कोर्ट आणि कर्मचारी निवासस्थानेही असलेली ही पिंपरी न्याय संकुलाची नऊ मजली इमारत आहे. त्यासाठी ४२८ कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र, तो निधी सरकारकडून न मिळाल्याने जागा ताब्यात असूनही १५ वर्षे बांधकाम सुरुच झाले नव्हते. त्यामुळे शहरातील वकील संघटनेने याबाबत शासन दरबारी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासाठी आमदार लांडगेंनी पुढकार घेतला.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात हा विषय लावून धरला. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात तो पुन्हा लांबणीवर गेला. त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळे त्याला पुन्हा गती मिळाली. आता प्रत्यक्ष बांधकामालाच सुरवात होणार आहे. ते दोन वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahesh Landge
Devendra Fadnavis News : 'सुपर स्पेशालिटी' फसलेल्या 'या' जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आणखी एक भूमिपूजन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com