Pune Municipal Corporation: पुणे पालिकेत समाविष्ट ३४ गावांच्या विकासकामांच्या अहवालासाठी मोठा निर्णय; समिती स्थापन

Municipal Corporation: ही १२ सदस्यांची समिती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचा अहवाल तयार करण्यासाठी १२ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही १२ सदस्यांची समिती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे.

यामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, पावसाळी गटारे, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य यासह आदी सुविधांचा सध्याची स्थिती आवश्यक कामे व निधी याचा समावेश या आराखड्यात असणार आहे, याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

Pune Municipal Corporation
Maharashtra Political Crisis : शिंदे - फडणवीस - पवार सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा कायम; आता बंगल्यांवरुन राजकारण तापणार..?

राज्य सरकारच्या आदेशानुसार, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्याची बैठक मंगळवारी (दि.४) झाली. या बैठकीला आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे शहरात २०१७ मध्ये ११ व २०२१ मध्ये २३ अशी एकूण ३४ गावांचा महापालिकेत समावेश केला आहे. पण येथे महापालिका फक्त कर गोळा करते, पण सुविधा दिल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो. याबाबत विधीमंडळाच्या अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

Pune Municipal Corporation
Maharashtra Political Crisis: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट? कोण कुठल्या मेळाव्याला उपस्थित होतं?

दरम्यान, यानंतर समाविष्ट गावांतील सेवा, सुविधांचा एक अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून याबाबतचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मंगळवारी अधिकारी स्तरावर पहिली बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये अहवाल कशा पद्धतीने तयार करायचा? तसेच प्रत्येकी तीन गावांतून एक या पद्धतीने १२ सदस्यांना समितीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com