Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव कारखान्याचा दुसऱ्या दिवशी पहिला निकाल आला, 1427 मतांनी मारली बाजी; अजितदादा विरुद्ध रंजन तावरेंमध्ये कोण पुढे?

Malegaon Elections Result 2025 Ajit Pawar : पहिल्या फेरीमध्ये 21 उमेदवारांपैकी तब्बल 17 जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीनंतर पहिला निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Malegaon Sugar Factory Election Result 2025
Malegaon Sugar Factory Election Result 2025sarkarnama
Published on
Updated on

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशी (बुधवारी) पहाटे पाच वाजता सुरू झाली. या मतमोजणीचा पहिला निकाल जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील उमेदवार रतन भोसले विजयी झाले आहे.

त्यांनी रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार बापूराव गायकवाड यांच्यापेक्षा 1427 मतांनी पराभव केला. रतन भोसले झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.

रतन कुमार भोसले यांना 8670 तर बापूराव गायकवाड यांना 7183 मते मिळाली. काल मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर मध्यरात्री एकपर्यंत पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू होती. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे पाचला सुरू झाली आहे.

पहिल्या फेरीत अजितदादांची बाजी

पहिल्या फेरीमध्ये 21 उमेदवारांपैकी तब्बल 17 जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. त्यात पहिला उमेदवार देखील अजित पवार यांच्या पॅनलचा विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार पहिल्या फेरीत चार जागांवर आघाडीवर होते.

Malegaon Sugar Factory Election Result 2025
Shivsena UBT-MNS : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा खासदार अन् राज ठाकरेंच्या शिलेदाराची एकत्र पत्रकार परिषद; नेमकं कारण काय?

अजित पवार विजयी

अजित पवार हे देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला उभे होते. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे ते उमेदवार होते. मंगळवारी ब वर्ग सभासदाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अजित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. अजित पवार यांना 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला अवघी दहा मते पडली.

Malegaon Sugar Factory Election Result 2025
50 Years Of Emergency: संजय गांधींची आणीबाणीमध्ये काय भूमिका होती? मुख्यमंत्री अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांना देत होते आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com