Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांना ईडी कोर्टाचा मोठा दिलासा; 6 महिन्यांनंतर येणार तुरुंगातून बाहेर

ED court decision Maharashtra politics : ईडीने 21 ऑगस्ट 2024 रोजी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी या निवासस्थानी छापा टाकत साडेपाच कोटी रक्कम हस्तगत केली होती.
Mangaldas Bandal
Mangaldas Bandal Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांना ईडी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता बांदल 6 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. ईडीचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी हा जामीन मंजूर केला आहे.

ईडीने 21 ऑगस्ट 2024 रोजी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी या निवासस्थानी छापा टाकत साडेपाच कोटी रक्कम हस्तगत केली होती. तसेच बांदल यांच्या 85 कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने जप्ती आणली आहे. मनीलॉन्डरिंगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल झाले होते.

Mangaldas Bandal
India's seven richest people : देशातील 7 गर्भश्रीमंतांच्या संपत्तीत अब्जावधींची घट; या यादीत कोण-कोण?

सुरुवातीला शिवाजीनगर बँक घोटाळाप्रकरणी बांदल यांनी 21 महिने तुरुंगात काढावे लागले होते. त्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना 6 महिने तुरुंगात राहावे लागेल आहे. मंगलदास बांदल यांच्यावतीने कोर्टात अबाद फोंडा, अदित्य सासवडे, तर शेलेश खरात, तन्मय काटे या वकिलांनी ईडी कोर्टात बाजू मांडली.

सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांशी संधान ठेऊन असलेल्या बांदल यांना यंदा लोकसभा निवडणूकीसाठी वंचित आघाडीने उमेदवारी दिली होती. त्यानंतर बांदल हे महायुतीच्या नेत्यांसोबत स्टेज वर दिसल्याने वंचित  बहुजन आघाडीने बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारीचा प्रचार केला होता.

Mangaldas Bandal
Pune Shiv Sena : धंगेकरांच्या पाठोपाठ पुण्यातील ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदेसेनेच्या वाटेवर

बारामती मतदारसंघात प्रचार करताना त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. पवार कुटूंबावर केलेल्या टिकेची चर्चा राज्यात झाली होता. त्यानंतर 21 ऑगस्ट 2014 रोजी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी या निवासस्थानी ईडीने कारवाई करत साडेपाच कोटी रक्कम जप्त केली. तसेच त्यांच्या 85 कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आणि त्यांना अटक केली होती.

(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com