Mangaldas Bandal News : तुरुंगातून सुटलेल्या बांदलांचे विरोधकांना थेट चॅलेंज : ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे’

मंगलदास बांदल रविवारी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार; गुन्ह्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबत नाव घेऊन बोलणार
Mangaldas Bandal
Mangaldas BandalSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : गेली २२ महिने तुरुंगात असलेले पुणे (Pune) जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. जेलमधून बाहेर येताच बांदलांनी एक डाव भूताचा झाला. आताचा देवाचा आणि माझा दुसरा डाव असेल. तसेच, ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे,’ असे म्हणत आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. (Mangaldas Bandal will clarify his political stance on Sunday)

बांदल यांच्यावर दाखल झालेला गुन्हे, त्यातील राजकीय हस्तक्षेप, यापुढील काळातील त्यांची राजकीय भूमिका याविषयी येत्या रविवारी (ता. २६) ते बोलणार आहेत, त्याबाबतची माहिती स्वतः बांदल यांनी दिली. अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची नावे घेऊन आपण बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mangaldas Bandal
Ranjitsingh Vs Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार : खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गौप्यस्फोट

सुमारे अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत पोचलेले आणि राष्ट्रवादीकडून शिरुर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक राहिलेल्या बांदलांना पक्षविरोधी कारवायांचे कारण सांगून पक्षातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर २२ महिन्यांपूर्वी त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणुकीसह खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते.

Mangaldas Bandal
Bawankule On Ajit Pawar : राष्ट्रवादीत अजित पवारांवर अन्याय : बावनकुळेंनी वात पेटवली

या सर्व गुन्ह्यांमधून बांदल यांची मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर बांदल पुन्हा राजकीयदृष्ट्या तालुक्यात सक्रीय होत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिरूर तालुक्यातील जे काही राजकीय नेते मला गेली कित्येक वर्षे तुरुंगात पाठविण्यासाठी आसुसलेले होते, त्यांची इच्छा एकदाची पूर्ण झाली आहे. एक डाव भूताचा होता, तो मी तुरुंगात जाण्याच्या निमित्ताने पूर्ण झाला आहे. आता दुसरा डाव देवाचा सुरू होईल आणि देवाच्या काठीला आवाज नसतो, हे त्यांनी आता लक्षात ठेवावे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलेला आहे.

Mangaldas Bandal
Solapur DCC Bank : मोहिते पाटील, सोपल, परिचारक, शिंदे बंधूंसह दिग्गजांना डीसीसीत ‘नो एन्ट्री’? चंद्रकांतदादांच्या काळातील ‘त्या’ कायद्याचा अडसर

रविवारी आपण सर्वकाही खुलासेवार, अगदी नावे घेवून बोलणार आहोत. त्यानंतर शिरुर-हवेलीच्या राजकारणात काय घडामोडी होतील, ते तुम्ही पाहतच राहाल, असेही म्हटले आहे.

Mangaldas Bandal
Sharad Pawar News: महाराष्ट्राच्या विकासातील पवारांचे योगदान उलगडणार पाच खंड : पहिल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

माझ्याविरोधात प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्यांना उघड करणार

मी रविवारपर्यंत कुणाचेही नाव घेणार नाही. मात्र रविवारी ज्यांनी-ज्यांनी माझ्याविरोधात ज्या काही टोकाच्या प्रतिष्ठा पणाला लावल्या होत्या, त्या सर्वांची नावे घेऊन आपण बोलणार आहोत. त्यांचे काळे उद्योगही आपण चव्हाट्यावर आणणार आहोत. स्वत: एकदम स्वच्छ आणि इतर जग मात्र गुन्हेगार असे म्हणणाऱ्यांची काळी उद्योगशैली कशी असते, ते आपण उघड करणार आहे. ‘राजकीय हिसाब तो जरूर पुरा करेंगे,’ असाही इशारा त्यांनी या वेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com