Manoj Jarange : ''महिला आयोग जर महिलांच्या समस्या सोडू शकत नसेल तर..'' ; जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी!

Manoj Jarange criticizes Women Commission : ''महिला आयोगाच्या पदावर जी बसलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीने असं स्थान निर्माण केलं पाहिजे की..'' असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Slams Women Commission Over Inaction : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात सुरू असलेल्या पोलीस तपासाची संपूर्ण माहिती कस्पटे कुटुंबीयांना सरकारकडून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा पोलिसांबरोबरच सीआयडीच्या मार्फत तपास करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे आणि महिला आयोगाच्या कारभारावरती देखील त्यांनी टीका केली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये सातत्याने महिला आयोगावर टीका होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज मनोज जरांगे पाटील यांनी देखील महिला आयोग जर महिलांच्या समस्या सोडू शकत नसेल तर तो बरखास्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, महिला आयोगाकडे राज्यातील ज्या ज्या महिला तक्रारी घेऊन येतील त्याबाबत कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. एखादी महिला आपली समस्या घेऊन मंत्र्यापर्यंत,अधिकाऱ्यापर्यंत, आमदार पर्यंत पोहोचू शकत नसेल तर तिच्यासाठी हक्काचं न्याय मंदिर म्हणून महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र त्या महिला आयोगातच महिलांवर अन्याय होणार असेल तर तो महिला आयोग बरखास्त केलेलाच बरा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange
Ajit Pawar in Baramati : बारामतीला पावसाचा जबरदस्त फटका अन् अजितदादा तत्काळ ॲक्शन मोडवर!

इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगाकडे कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडे माय माऊली म्हणून ताबडतोब कारवाई होणं अपेक्षित आहे. पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाणं आवश्यक असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange
Public Works Department News : मंत्री आले अन् सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू झाले बदल्यांचे वारे!

महिला आयोगाच्या पदावर जी बसलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीने असं स्थान निर्माण केलं पाहिजे की महिलांना महिला आयोग हा आधारचं स्थान वाटलं पाहिजे. इथून पुढे महिला आयोगाकडे तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक महिलेची तक्रारची दखल योग्य पद्धतीने घेणे आवश्यक असल्याचे जरांगे म्हणाले.

(Edietd by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com