Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटलांनी एकाच दिवशी घेतल्या पाच जिल्ह्यांत सभा; सरकारचे वाढविले टेन्शन

Maratha Reservation : आज सकाळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेतले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Walchandnagar : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पेटून उठलेले जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवारी ता. २१ ऑक्टोबर) एकाच दिवशी सातारा, सोलापूर, पुणे, नगर आणि बीड जिल्ह्यांत सभा घेतल्या. या पाच जिल्ह्यांतील सभांमधून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचा इशारा देत सरकारचे टेन्शन वाढविले आहे. (Manoj Jarange Patil held meetings in five districts on the one day)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली दोन दिवसांपासून पाच जिल्हे पिंजून काढले आहेत. मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळू शकते, याचा रोडमॅप त्यांनी प्रत्येक सभेतून सादर केला. सभेतही त्यांनी मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आरक्षण घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही, असा निर्धारही बोलून दाखवला. जरांगे पाटील यांनी आज (शनिवारी) एकाच दिवसात पाच जिल्ह्यांमध्ये सभा घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जागृती केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Thane NCP : शरद पवार गटाकडून तरुणांची फळी उभारण्याचा प्रयत्न; ठाणे राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

मनोज जरांगे हे शुक्रवारी रात्री सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी छोटेखानी सभा घेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये भव्य सभेचे आयोजन केले होते. हजारो नागरिकांनी सभेसाठी गर्दी केली होती.

अकलूजच्या सभेनंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरामध्येही सभा झाली. रखरखत्या उन्हामध्ये हजारो मराठा बांधवांनी सभेसाठी गर्दी केली होती. इंदापूरनंतर नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या दिवसातील शेवटची सभा बीड जिल्ह्यातील भांभरसुंभा येथे झाली.

Manoj Jarange Patil
Nagpur Assembly Session : 'दहा दिवसांचं अधिवेशन म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ वाटला का?'

तत्पूर्वी शुक्रवारी (ता.२० ऑक्टोबर) जरांगे पाटील यांनी पुणे जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यामध्ये सकाळी जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली. राजगुरुनगर, बारामती व सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहीवडीमध्ये सभा घेतल्या.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षण समितीने मागितली दोन महिन्यांची मुदतवाढ; तिढा वाढण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com