Manoj Jarange Patil Pune News :
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील हे राज्यातील मराठा समाजाचे नेते कसे झाले? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचे हे आंदोलन राज्यभर कसे पसरले? याबाबत जरांगे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात माहिती दिली. यातून जरांगे यांचा पूर्वीचा इतिहास काहीसा समोर आला आहे.
मनोज जरांगे पाटील हे सातवी शिकलेले आहेत. तसेच ते पूर्वी एका राजकीय पक्षाशी संलग्न होते, अशी टीका वारंवार केली जाते. या टिकांना जरांगे पाटील यांनी उत्तर दिले. मी मराठा समाजाचे नेतृत्व स्वतःहून हातात घेतले नाही. मला मराठा समाजाने स्वीकारले. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. माझं शिक्षण जेमतेम बारावी झालं आहे. माझ्या मागे कोणताही राजकीय वारसा नाही. मी गेल्या 22 वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आलो आहे. माझा जास्त अभ्यास अथवा पुस्तक वाचन नाही. मी गोदापट्ट्यातून समाजाच्या कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणच्या 23 गावं माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि खऱ्या अर्थाने त्याच खोऱ्यातून माझ्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे तिथून आंदोलनाचा लढा सुरू झाल्याचे जरांगे यांनी सांगितले.
एक सप्टेंबरच्या त्या रात्री नेमकं काय झालं? याबाबत जरांगे यांनी पुढे सांगितलं. ज्या दिवशी पोलिसांनी हल्ला केला. त्याच्या आदल्या दिवशी पाचशे ते सहाशे पोलिस आले होते. त्यांच्याकडून मला उपचार घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. उपोषण करताना मी कधीही उपचार घेत नाही. बारा दिवस मी बिना अन्नपाण्याचा काढू शकतो. ( Maratha Reservation ) पोलिस आल्यानंतर मोठा जमाव जमला. मात्र त्या जमावाला मी शांत केलं. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनीही माझी पाठ थोपटली. त्यानंतर दोन दिवसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस पुन्हा गावात दाखल झाले. त्यांनी मला उपचार घेण्याचा आग्रह केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मी उपचार घेतले. त्यामुळे पोलिस निघून गेले, असे ते म्हणाले.
मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी पोलीस गावात आले. त्यावेळी पोलीस इतक्या मोठ्या संख्येने आले की त्यांची संख्याही मोजणं अवघड झालं होतं. दहा पेक्षा अधिक गाड्यांमध्ये फक्त लाठ्याकाठ्या, हेल्मेट अश्रूधुराच्या नळकांड्या आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात होतो, जरांगे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंदोलन स्थळी आल्यावर त्यातील 200 ते 300 पोलिस थेट आंदोलनाच्या ठिकाणी घुसले. काही साध्या कपड्यातही होते. माईकच्या वायर तोडल्या. आमचा आवाज बंद झाला. काही पोलिसांनी कोपऱ्या मारल्या. आम्ही म्हणत होते असे करू नका. अशात आमचे काही दोन-तीन मुलं खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी वरून अचानक हल्ला सुरू केला. त्यानंतर परिस्थिती एवढ्या विकोपाला गेली की आता तो क्षण आठवला तरी वाईट वाटतं, असं जरांगे म्हणाले. मी कायम खरं बोलतो, सजा लागली तरी हरकत नाही, असा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.