Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार; या ठिकाणी होणार जाहीर सभा

Manoj Jarange Sabha In Pune : जालन्यातील ऐतिहासिक सभेनंतर आता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पुण्यात होणार आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांची गेल्या आठवड्यात शनिवारी जंगी सभा झाली. जालन्यातील अंतरवाली सराटीत लाखोंची सभा घेत जरांगे पाटील राज्य सरकारला १० दिवसांचा वेळ देत अल्टिमेटम दिला आहे. अंतरवाली सराटीमधील लाखोंच्या सभेनंतर आता जरांगे पाटील यांची तोफ आता पुण्यात धडाडणार आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Speech News : शिंदे समितीने काम थांबवावे, जरांगेंच्या मागणीने सरकारपुढे नवे संकट ?

मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा खेड तालुक्याकडून ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

राजगुरुनगरमध्ये होणार सभा

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबरला जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. गेल्या १ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील खेड तालुक्यात घेणार सभा घेणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली आहे. खेड तालुक्यातील गावागावामधील तरुण या साखळी उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. जरांगे पाटील यांची खेड तालुक्यातील ही सभा ऐतिहासिक ठरेल, असे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

जरांगे पाटील यांचा अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी आता राज्य सरकारकडे १० दिवस उरले आहे. यानंतर आपण येत्या २२ ऑक्टोबरला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत. आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यामुळे आता यावर राज्य सरकार या भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj jarange Rally News : `आरक्षण दिल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही` जरांगेच्या प्रामाणिकपणावर मराठा फिदा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com