
Navi Mumbai Road Rage Case : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. टॅक क्लिनर अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांकडून त्यांना अटक करण्यास धावाधाव केली जात आहे. अनेक दिवसांपासून त्या पोलिसांना गुंगारा देत असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे.
नवी मुंबईतील न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल कला होता. त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. आता यावर 13 ऑक्टोबरला पून्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलीस त्यांना अटक करू शकणार नाहीत.
खेडकर यांच्या वकिलांनी बेलापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर खेडकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून 13 तारखेला अंतिम फैसला होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला नवी मुंबईतील मुलूंड ऐरोली रस्त्यावर एका कारला ट्रकची धडक बसली होती. त्यानंतर याच कारमधून ट्रकच्या क्लिनरला जबरदस्तीने ताब्यात घेत पुण्यात आणण्यात आले. त्याला ज्या बंगल्यात ठेवण्यात आले होते, तो बंगला खेडकर कुटुंबाचा होता.
नवी मुंबई पोलिसांचे पथक खेडकर यांच्या पुण्यात बंगल्यात क्लिनरच्या शोधासाठी आले होते. मात्र, मनोरमा खेडकर यांनी गेट उघडण्यास नकार दिला. तसेच पोलिसांना रोखण्यासाठी श्वानांना अंगावर सोडले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी नवी मुंबईत अपहरण आणि पुण्यात पोलिसांना रोखल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. खेडकर कुटुंबाचा बॉडीगार्ड प्रफुल साळुंखे याला याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्यावतीने कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये त्या पोलिसांना तपासात सहकार्य करतील, असे म्हटले आहे. यापार्श्वभूमीवर कोर्टाने खेडकर यांना तात्पुरता दिलासा दिला. पोलिसांकडून 13 तारखेला होणाऱ्या सुनावणीवेळी खेडकर यांच्या जामीनाला विरोध केला जाईल. यावेळी पोलिसांकडून खेडकर यांच्याविरोधात आतापर्यंत तपासात आढळून आलेले पुरावे सादर केले जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.