PCMC News : शरद पवार राष्ट्रवादीची तरुणाईत क्रेझ वाढली; महिन्यात यंग ब्रिगेड 'इन्कमिंग'ची झाली हॅट्रिक

NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश पक्ष अजित पवार गटाबरोबर गेला.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश पक्ष अजित पवार गटाबरोबर गेला. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीने शहरात जोरात नव्याने पक्षबांधणीला सुरूवात केली असून यंग बिग्रेडवर अधिक लक्ष दिले आहे. त्यासाठी शहराची जबाबदारी पक्षाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवारांकडे (Rohit Pawar) दिली असून त्यांनी व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे हा तरुण चेहरा दिला. रोहित व कामठे हे दोघे मिळून तरुण पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश देत आहेत.

यंग ब्रिगेड रडारवर घेतल्याने किमान उद्योगनगरीतील तरुणाई मोठ्या संख्येने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामागे उभी राहू लागल्याचे चित्र आहे. त्यांनी मुंबईत बुधवारपासून राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणे सुरू केले. त्यात पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघ मोडत असलेल्या शिरुरचा तो आज घेतला गेला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष कामठे यांनी शहरातील सागर चिंचवडे हा आणखी एक तरुण चेहरा पक्षात आणला.

Sharad Pawar News
Vijay Wadettiwar - CM Shinde Meeting : सर्वात मोठी बातमी ! विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

घरवापसी तथा 'इन्कमिंग'ची महिन्याभरात झालेली ही हॅट्रिक झाली. १५ दिवसांपूर्वीच तीन तरुण चेहरे पक्षात आले होते. तर, रोहित यांच्या पहिल्याच दौऱ्याची सुरूवात गेल्या महिन्यात १८ तारखेला इनकमिंग आणि घरवापसीने झाली होती. सागर हे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे घराणे हे तसे मूळचे कॉंग्रेसी (Congress). त्यांचे वडील आणि शरद पवार यांनी एकत्र काम केलेले आहे. मात्र, गतवेळी २०१७ च्या पिंपरी पालिका निवडणुकीत सागर हे शिवसेनेत गेले.

त्यांच्या पत्नीने त्यावेळी पालिका निवडणूक लढवली. राष्ट्रवादीत प्रवेश का केला हे सांगताना ते म्हणाले, अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे आणि अजित पवारांमुळे उद्योगनगरीचा विकास झाला असला, तरी खरा चेहरामोहरा हा शरद पवारांनी बदलला. पडत्या काळात सत्ता भोगलेले आता त्यांना सोडून गेले आहेत. तरीही या वयात ते पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहेत. म्हणून त्यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे सागर म्हणाले.

येत्या महिन्याभरात चिंचवडमधील पन्नासेकजण राष्ट्रवादीत येणार असून त्यात साठ टक्के भाजपचे असतील, असा मोठा दावा सागर चिंचवडेंनी केला. तसे झाले, तर भाजपच्या (BJP) या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडणार आहे. अजित पवारांबरोबर गेलेले शहरातील बहूतांश पदाधिकारी, माजी नगरसेवक हे तिकडे समाधानी नाहीत. दोन्ही गट एकच आहेत, म्हणून ते तिकडे गेले. मात्र, पवारसाहेबांना केंद्रीय निवडणूकआयोगाचा उंबरा चढायला लागला, तेव्हा, मात्र फूट स्पष्ट झाली. त्यातून खात्री होऊन घरवापसी सुरू झाली आहे. ती पुढेही सुरुच राहणार आहे, असे ते म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Sharad Pawar News
Thane Politics : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com