
Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे पुण्यासह संपूर्ण राज्य हादरलं आहे. अशातच आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) कुटुंबियांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी मुलीचा छळ केल्याचा गंभीर आरोप करतानाच तिची आत्महत्या नव्हे,तर हत्याच असल्याचाही दावा केला आहे. अशातच आता मराठा मोर्चानं आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
पुण्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवांची सोमवारी (ता.26) पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी समाज हिताचा निर्णय घ्यावा लागणार असल्यावर एकमत झालं. ही बैठक पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा (Maratha) समाजाची लग्न सोहळ्यात होणारी प्रथा परंपरा यावर चर्चा झाली. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थितीत होते.लग्न करताना काहीतरी आचारसंहिता असावी असंही ठरलं. तसेच समाज म्हणून आपल्याला अशा घटनांविरोधात एकत्र यायला पाहिजे,यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे.समाज बदनामी होते आहे. जाणीवपूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का. विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याचं कदापि समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली, ती फक्त एका समाजातच होत नाही,तर सर्वच समाजात ही वृत्ती आहे. समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे.असा आरोपही यावेळी करण्यात आला.
लग्नाचे प्रदर्शन होते आहे. मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मीडियातून मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे. आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नंणदांनी कसं वागायचं हे शिकवा. मुलीला शिकवून तिला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जोरदार प्रयत्न व्हायला हवेत,असा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मुलीला शिकवा, तिला तुम्ही विश्वास द्या, आई वडील भाऊ आम्ही सोबत आहोत.मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे, हे आज मान्य करायला हवं.लग्न,टीळे याचं राजकीयकरण झालं आहे. पुणे शहरातील काही गावे तिथं तुम्ही मांडव टाकायला आठ वीस लाख देतात.पुण्यात वीस लाखांच्या आत लग्नच होत नाही.भाषणबाजी बंद करा,लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा,कमी खर्चात करा.साखरपुडा, हळद एकत्रित केलं जावं असाही विचार या बैठकीतून पुढे करण्यात आला.
शाहू महाराज यांनी एकेकाळी जमीन विकून मुलीचे लग्न करू नका,असं म्हटलं होतं. तसेच वधू-वर यांच्यात अल्पशिक्षित मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे. आम्ही कसेही लग्न करायला तयार आहोत. हुंडा द्यायला तयार आहे. तर दुसरीकडे मुलीच्या अपेक्षा वाढल्या असून समाजातील 25 टक्के मुलांच्या लग्नावर टांगती तलवार असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.