Mayuresh Wanjale: पुण्यातील मनसेचे पहिले आमदार, 'गोल्ड मॅन'च्या सुपुत्राची राजकारणात एन्ट्री; खडकवासल्यात आघाडी अन् महायुतीचे टेन्शन वाढलं!

Pune Gold Man Son Enters Politics: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील तीन उमेदवारांमध्ये मयूरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. मयुरेश यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या गोटात चलबिचल सुरु झाली आहे.
mayuresh wanjale
mayuresh wanjaleSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेचं खात उघडणारे पहिले आमदार, 'गोल्ड मॅन'अशी ख्याती असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या सुपुत्राने राजकारणात एन्ट्री केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल (मंगळवारी) 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेने निवडणुकीच्या आखाड्यात उतवले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील तीन उमेदवारांमध्ये मयूरेश वांजळे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. मयुरेश यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या गोट्यात चलबिचल सुरु झाली आहे. खडकवासल्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून खडकवासला मतदारसंघ परिसरात मयुरेश वांजळे हे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत होते. उमेदवारी जाहीर झाल्याने ते जोमाने प्रचाराला लागले आहेत.

mayuresh wanjale
Kolhapur Politics: कोल्हापूर उत्तर वेटिंग वरच, शिवसेनेकडून राधानगरीतून आबिटकर आणि करवीरमधून नरके

खडकवासला मतदारसंघातून 2009 मध्ये त्यांचे वडील रमेश वांजळे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली. विधिमंडळ देखील गाजवले होते.

आमदार पदाच्या शपथविधी सोहळ्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठीतून शपथविधी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी वांजळे यांनी अबू आझमी यांचा माईक हिसकावून घेतला होता.

या प्रकरणी विधीमंडळ संसदीय समितीने मनसेचे चार आमदार निलंबित केले होते. या आमदारांमध्ये वांजळे यांचं ही नाव होतं.पुण्याच्या हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते विधानसभेतील आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले.

वांजळे परिवाराचे राजकारण

  • रमेश वांजळे पुण्याच्या खडकवासल्याचे आमदार, ‘मनसे’ चे पुण्याचे पहिले आमदार, हवेली पंचायत समितीचे सदस्य, हवेली पंचायत समितीचे उपसभापती, 2009 मध्ये काँग्रेसमधून ‘मनसे’मध्ये प्रवेश, 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर विजयी

  • मयुरेश वांजळे यांची बहिण सायली वांजळे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत.वांजळेंच्या आई हर्षदा यांनीही राष्ट्रवादीकडून 2011मध्ये विधानसभा लढवली होती. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सायली वांजळे यांनीही राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीतर्फे त्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. वारजे प्रभागातून त्या निवडूनदेखील आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com