Maratha Reservation : भले शाब्बास, दिवंगत कर्मचाऱ्यांनाही लावली ड्युटी...

PMC Confusion : कर्तव्यदक्ष पुणे महापालिकेच्या कामाला कुणाची 'दृष्ट न लागो'
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Pune City News :

सध्या पुण्यात चर्चा सुरू आहे ती पुणे महापालिकेने केलेल्या पराक्रमाची! राज्यभर मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पुणे शहरात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने एक हजार कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती केली आहे. ही यादी राज्य सरकारला पाठवण्यात आली आहे. परंतु ही यादी तयार करताना महापालिका प्रशासनाने मोठा घोळ घातला आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यभर मराठा समाजाचे (Maratha Reservation) मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने महापालिकेकडून माहिती मागवली आहे.

Maratha Reservation
Gopichand Padalkar: शिंदेंनी घरकोंबडा व्हायचं का..."; उद्धव ठाकरेंवर पडळकरांचे टीकास्त्र

शहरातील सर्वेक्षणासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) उपायुक्त चेतना केरुरे यांची नियुक्ती सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक हजार 70 कर्मचारी काम करत आहेत.

दोन आठवडे हे कर्मचारी गुंतून राहणार असल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची फौज या कामाला लागल्याने काही प्रमाणात महापालिकेच्या कामकाजावरती परिणाम होऊ शकतो.

पुणे महापालिकेच्या परिसरातील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम करत आहे. यासाठी राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या अहवालाचा वापर आरक्षणाच्या पूर्ततेसाठी करण्याचे नियोजन आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिकेने घातला घोळ

घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पालिकेकडून सरकारला पाठवण्यात आली आहे. यात काही दिवंगत तर काही निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जुनी यादी पाठवली

महापालिकेचा सामान्य प्रशासन विभाग कर्मचाऱ्यांची यादी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून घेत असतो. त्यानुसार ऑर्डर काढल्या जातात. नावे भरपूर असल्याने प्रत्येक नाव तपासू शकत होत नाही. माहिती तंत्रज्ञान विभाग म्हणतो सामान्य प्रशासन विभागाने माहिती अपडेट केली तर आम्ही तत्काळ बदल करतो. शेवटी, 6 डिसेंबरला दिलेल्या यादीत ऑक्टोबरअखेर पर्यतच्या सेवकांची माहिती होती. त्यामुळे सरकारला 2 महिने जुनी यादी पाठवली गेली.

(Edited by Avinash Chandane)

Maratha Reservation
Shiv Sangram News: 'शिवसंग्राम' मैदानात; लोकसभेच्या तीन, तर विधानसभेच्या 12 जागा लढवणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com