Maval Lok Sabha Constituency : पुणे, शिरुर नंतर आता 'मावळ' मध्येही होणार 'वंचित'ची एंट्री!

Vanchit Bahujan Aaghadi News : दुरंगी नाहीतर तिरंगी लढत; महायुतीला दिलासा तर महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार
Vanchit Bahujan Aghadi
Vanchit Bahujan AghadiSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीबरोबर हातमिळवणी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने आता राज्य़भरातील मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी अनेक ठिकाणच्या लढती आता महायुती आणि महाविकास आघाडी अशा थेट दुरंगी न होता तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये आता मावळ मतदारसंघाचाही समावेश होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vanchit Bahujan Aghadi
Lok Sabha Election 2024 : 'वंचित'चे टार्गेट ठाकरेंचीच शिवसेना, पण फटका राष्ट्रवादी अन् काँग्रेसलाही...

मावळच नाही, तर लगतचा शिरुर, पुणे शहर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा(Vanchit Bahujan Aaghadi) प्रवेश होण्याआधी या ठिकाणी दुरंगीच लढती होणार होत्या. असंच काहीसं चित्र राज्यभरातील इतर मतदार संघाबाबतही होतं. पण,'वंचित'ने आता पुणे जिल्ह्यासह (बारामती अपवाद) राज्यभर उमेदवार दिल्याने तेथे त्या तिरंगी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे आघाडीचे टेन्शन वाढले असून महायुतीचं कमी झाल्याचं बोललं जात आहे. कारण वंचितचा उमेदवार हा आघाडीचीच मते खाणार आहेत. गेल्यावेळी त्यांच्या उमेदवाराने प्रचार न करताही मावळात पाऊण लाख मतं घेतली होती.

बारामतीमध्ये वंचितने आघाडीच्या(राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला आहे. तर,पुण्यात वसंत मोरे(Vasant More) आणि शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राहिलेल्या जिल्ह्यातील चौथ्या मावळ मतदारसंघात येत्या दोन दिवसांत उमेदवार देणार असल्याचे `वंचित`च्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी `सरकारनामा`ला सांगितले आहे.

त्यामुळे मावळचीही लढत आता पुणे आणि शिरुरसारखी तिरंगी होऊ घातली आहे. दरम्यान, वंचितच्या या एंट्रीने मावळात विजयी उमेदवाराचे लीड यावेळी गतवेळपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच वंचितची उमेदवारी ही महायुतीच्या पथ्यावर पडणारी असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आघाडीचे मात्र टेन्शन वाढले आहे.

Vanchit Bahujan Aghadi
Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे 'वंचित'चे उमेदवार, पुण्यात मोहोळ- धंगेकर- तात्यांमध्ये होणार तिरंगी लढत

मावळ हा पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली असा निम्मा-निम्मा विभागला गेलेला आहे. या मतदारसंघात 'वंचित'ची बऱ्यापैकी ताकद आहे. मागील वेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील यांना येथे संधी दिली होती. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची 75 हजार 904 मतं घेतली होती.

यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) (म्हणजे दोन्ही शिवसेना गटाचे) उमेदवार घाटावरील म्हणजे पिंपरी-चिंचवडचे आहेत. जर,'वंचित'नेही यावेळी घाटावरील आणि उद्योगनगरीतीलच उमेदवार दिला, तर तो गेल्यावेळी घेतली त्यापेक्षा अधिक मते घेण्याची शक्यता आहे. ती बहुतांश आघाडीच्या उमेदवाराची असल्याने त्यांची चिंता या वंचितच्या एंट्रीने वा़ढणार यात वाद नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com