Maval Lok Sabha Constituency : पिंपरी आणि चिंचवडमधील नेत्यांवर भरवसा टाकला अन् तेथेच वाघेरेंचा गेम झाला !

Maval Lok sabha Election Results 2024 : श्रीरंग बारणे यांना लीड दिलेल्या चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप यांचा आमदारकीचा दावा प्रबळ झाला आहे. तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही बारणेंना 31 हजार 38 चे लीड दिले असल्याने त्यांच्याही तिकिटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere Patil Sarkarnama

Pimpri News : पिंपरी या स्वत:च्या विधानसभा मतदारसंघातच आघाडीचे (ठाकरे शिवसेनेचे) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील हे 17 हजार मतांनी पिछाडीवर पडले अन तेथेच त्यांचे विजयाचे गणित बिघडले. त्यात पिंपरीसह चिंचवड या मतदारसंघातील नेत्यांवर त्यांनी विश्वास टाकलेल्या विश्वासाला तडा केला आणि त्यांचा गेम झाला. 96 हजार मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले.

घाटावरील पिंपरी-चिंचवडकर वाघेरे पिंपरी,चिंचवड आणि मावळ या घाटावरीलच विधानसभा मतदारसंघात मागे राहिले. तेथे ते 97 हजार 437 मतांनी पिछाडीवर पडले. त्यांचे होम ग्राउंड असलेल्या पिंपरीने त्यांना दगा दिला. तर, त्यांचा मोठा विश्वास असलेल्या चिंचवडनेही तो सार्थ ठरवला नाही. या दोन मतदारसंघात वाघेरे 92 हजार 502 मतांनी मागे पडले. तेथेच त्यांचा गेम झाला. त्यांनीच याला बुधवारी दुजोरा दिला. पिंपरी आणि चिंचवडमधील नेत्यावर विश्वास टाकला,पण तेथेच गणित फसले,असे वाघरेंनी नाराजीने सांगितले.काही बाबतीत कमी पडल्याची कबुली त्यांनी दिली.तर,थेट संपर्क आणि विकास कामामुळे पुन्हा निवडून आलो,असे बारणे म्हणाले.

बारणेंच्या विजयाचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार?

बारणेंनी खासदारकीची हॅटट्रिक केली. त्यानंतर आता त्याचे परिणाम 4 महिन्यानंतर होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काय होणार याचे आडाखे बांधण्यात येऊ लागले आहेत. मात्र,मावळमधील (Maval) सहाही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे आमदार वाढीसाठी लोकसभेचा विजय उपयोगी पडणार नाही.फक्त विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिट मागण्यासाठी ताकद, मात्र मिळाली आहे. मात्र, कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात बारणे हे 17 हजार 607 मतांनी पिछाडीवर राहिले आहेत.त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे पुन्हा तिकिट देतील की नाही,याविषयी शंका आहे.

 Sanjog Waghere Patil
Maval Election result 2024 : चिंचवडवर जगताप कुटूंबाचा होल्ड कायम, बारणेंना दिले सर्वाधिक पाऊण लाखांचे लीड !

बारणेंना 74 हजार 765 एवढे घशघशीत लीड दिलेल्या चिंचवडच्या भाजप (BJP) आमदार अश्विनी जगताप यांचा आमदारकीचा दावा प्रबळ झाला आहे.त्यांच्याच पक्षाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही बारणेंना 31 हजार 38 चे लीड दिले असल्याने त्यांच्याही तिकिटाचा मार्ग मोकळा झाला आहे.भाजपच्या तुलनेत अजित पवार राष्ट्रवादी आमदारांच्या मतदारसंघात (पिंपरीचे अण्णा बनसोडे 16 हजार 737 आणि मावळचे सुनिल शेळके 4 हजार 935) कमी मताधिक्य बारणेंना मिळाले आहे. त्यांना भाजप संलग्न अपक्ष आमदार महेश बालदी यांच्या उरणमध्ये 13 हजार 250 चे लीड भेटले आहे.त्यामुळे ते भाजपकडून उमेदवारी मागू शकतात.

(Edited by : Chaitanya Machale)

 Sanjog Waghere Patil
Narendra Modi : महाराष्ट्रात मोदी 'ब्रॅण्ड'ला जबरदस्त धक्का

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com