Maval Lok Sabha Constituency: मावळात लोकसभेला शिवसेनेचेच दोन्ही गट भिडणार; दिवाळीत इच्छुकाने केली साखरपेरणी

Shrirang Barne News: बारणे यांच्या उमेदवारीला भाजपच्या मोदी-शाहांनी हिरवा कंदील दिला आहे.
Maval Lok Sabha Constituency
Maval Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Pimpri:आगामी लोकसभेला शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत होण्याचे संकेत नुकतेच (ता. १७) मिळाले. त्यानंतर मावळ लोकसभेतही अशीच लढाई, पण ती शिवसेनेच्या दोन्ही गटांत होण्याची शक्यता आता वाढली आहे.

मावळ मतदारसंघात सुरुवातीपासून आतापर्यंत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने या वेळी तो ते आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेला सोडतील, असा अंदाज आहे. तेथे फक्त शिवसेनेचाच खासदार होत आहे. २००९ ला गजानन बाबर, तर २०१४ आणि २०१९ ला श्रीरंग बारणे तेथून निवडून आले आहेत. बारणे या वेळी हॅटट्रिकवर आहेत. त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या मोदी-शाहांनी हिरवा कंदील दिल्याने त्यांनी आपणच महायुतीचे उमेदवार असणार असल्याची घोषणाही करून टाकली आहे.

Maval Lok Sabha Constituency
Manoj Jarange : म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही, पण..; जरांगेंचा भुजबळांना इशारा

गतवेळी त्यांनी अजित पवारांचे पूत्र पार्थ यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे बारणेंच्या प्रचाराला या वेळी अजितदादा येणार का, अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे. कारण ते आता राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाले असून, महायुतीचे उमेदवार म्हणून बारणेंच्या नावाची मावळाची घोषणाच काय ती बाकी राहिली आहे.

शरद पवार गटही मावळ लढण्याची शक्यता कमी...

गेल्यावर्षी शिवसेना फुटली अन् बारणे हे शिंदे गटात गेले, तर यावर्षी राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे अगोदरच मावळात विजय मिळत नसल्याने राष्ट्रवादीने (अजित पवार गट) या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून देण्याचे ठरवले आहे. म्हणूनच की काय त्यांनी मावळ सोडून राज्यातील इतर नऊ ठिकाणी आगामी लोकसभेला दावा केला आहे.

त्यात दोन्ही राष्ट्रवादीकडे तेथे तुल्यबळ उमेदवार दिसत नाहीत. परिणामी शरद पवार गटही मावळ लढण्याची शक्यता कमी आहे. कारण कॉंग्रेसने या मतदारसंघावर या वेळी अगोदरच दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेतच तेथे या वेळी लढत होईल, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. बारणेंच्या विरोधात आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे उमेदवार म्हणून भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव घेतले जात आहे.

होर्डिंग्ज चर्चेचा विषय...

वाघेरे यांनीही आपण आगामी लोकसभा मावळमधून लढणार असून, त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचे `सरकारनामा`ला सांगितले. पण कुठल्या पक्षाकडून हे सांगणे त्यांनी तूर्तास हुशारीने टाळले, पण ठाकरे शिवसेनेला ही जागा अजित पवार गटाने सोडण्याची केलेली तयारी पाहता ते आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील, याला दुजोरा मिळत आहे. घाटावर आणि घाटाखाली असा निम्मा-निम्मा मावळ मतदारसंघ विभागलेला आहे. तेथील सहा विधानसभा मतदारसंघात वाघेरेंनी दीपावलीच्या शुभेच्छा देणारी पाचशे होर्डिंग्ज लावून वातावरणनिर्मिती केली आहे. त्यावर त्यांच्या फोटोमागे संसद इमारत असून, पक्ष वा पक्षाचे चिन्ह त्यांनी खुबीने टाळले आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या टोल नाक्यावरील ही भव्य होर्डिंग्ज चर्चेचा विषय झाली आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Maval Lok Sabha Constituency
Jayashree Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com