Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि अजित पवार गटातील नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जाण्याचे नाव घेत नाही. आरक्षणाच्या मुद्दावरून दोन्ही नेत्यामध्ये जुंपली आहे. "हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. म्हातारा माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरं नाही," असे म्हणत जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे.
"छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते, पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. त्यांनी किती उचकवलं तरी शांत रहा, मला त्यांचं सगळं माहीत आहे, मुंबई मधून आल्यावर काय केलं ,येवल्यातून आल्यावर काय केलं. हे सर्व मला माहीत आहे," असा गौप्यस्फोट जरांगेंनी देहू मधील सभेत केला. म्हाताऱ्या माणसाकडून भुजबळांकडून प्रयत्न केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
जरांगे म्हणाले, "माझं लेकरू अधिकारी बनेल अन् माझं कष्ट कमी होईल असं मराठा समजायचा, पण राज्यात षडयंत्र रचलं गेलं अन् ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. मराठ्यांच्या पाठीमागून विश्वासघाताचे वार होत होते, मात्र याची कल्पना नव्हती. मराठ्यांमुळं जे मोठे झाले, ते कधीच मराठ्यांच्या मदतीला धावून आले नाहीत,"
"मराठ्यांची मुलं शेतातच राहिली, आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. त्यांनी नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय, पण याला विरोध होतोय," अशी खंत जरांगेंनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.