Jayashree Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

MP Rahul Shewale's Mother Passed Away : आज दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jayashree Shewale
Jayashree ShewaleSarkarnama

Mumbai News : शिवसेना शिंदे गटातील खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे (वय ७३) यांचे रविवारी (ता.19) सायंकाळी आठ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले.

आज (सोमवारी) दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Jayashree Shewale
Balasaheb Thorat: मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांच्या स्वीय सहायकावर फसवणुकीचा गुन्हा

उपचारांनंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. रविवारी सायंकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने त्यांना चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या मागे अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे अशी तीन मुले, वर्षा अविनाश शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली नवीन शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे या तीन सूना आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.

Jayashree Shewale
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगात उद्यापासून नियमीत सुनावणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com