Medha Kulkarni News : प्लीज कोणी रागावू नका; मेधाताईंची फेसबुक पोस्ट व्हायरल

Medha Kulkarni Appeal to Supporters From Facebook Post : भाजप नेत्या मेधा कुलकर्णींची फेसबुक पोस्ट व्हायरल...
Medha Kulkarni News
Medha Kulkarni News Sarkarnama
Published on
Updated on

Medha Kulkarni Pune News :

पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्जही भरला. उमेदवारी मिळाल्यानंतर मेधाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. निष्ठावंतांना न्याय मिळतोच, असे त्या म्हणाल्या होत्या.

मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने सर्वांना धक्काच दिला. खासकरून यामुळे पुण्यातील राजकीय गणितं बदलणार आहेत. मेधाताईंमुळे भाजपची ताकद वाढणार आहे. याचे कारणही समोर आले आहे. मेधाताईंना Rajya Sabha Election उमेदवारी मिळताच त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा मोठा वर्षाव झाला. हजारो मेसेजे, व्हॉट्सअॅप मेसेजेस त्यांना आले. याशिवाय शेकडो फोन कॉल्सही आले. याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टवरून दिली.

Medha Kulkarni News
Pune BJP News : मेधाताईंना तिकीट देऊन हायकमांडने दिला शहर भाजपला कडक इशारा?

"कशी होऊ उतराई ..."

"कशी होऊ उतराई ..." या शीर्षकाखाली मेधाताईंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. काल मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरला. स्वतः मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मी अर्ज भरला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते आत्तापर्यंत अभिनंदनाचे अक्षरशः हजारो फोन मला आले. शुभेच्छांचा, अभिनंदनाचा वर्षाव तुम्ही सर्वांनी केलात. माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या नेमणुकीने तुम्हाला झाला होता, कारण तुम्ही याची खूप प्रतीक्षा केली होती. तसेच कित्येक हजारांत व्हॉट्सअॅप मेसेजेस आणि एसएमएस आले. अनेक जण घरी येऊन भेटले, असे मेधाताई म्हणाल्या.

'आशीर्वादाचा प्रचंड वर्षाव'

'अनेक फोन मी स्वतः उचलले, पण कित्येक फोनवर मला बोलता आले नाही. एसएमएसला, व्हॉट्सअॅपला अजून प्रतिसाद देता आला नाही. एका फोनवर बोलत असताना दोन-चार फोन मिस होत होते. आशीर्वादाचा इतका प्रचंड वर्षाव होत होता. मी प्रयत्न करूनही प्रत्येक कॉल उचलू शकत नव्हते. याची माझीच मला किती खंत आहे हे मी कसे सांगू?', असे त्या म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'काल फॉर्म भरेपर्यंत खूप तपशीलवार तयारी करणे आवश्यक ठरले. खूप नोंदी काळजीपूर्वक करावयाच्या होत्या. उमेदवार आणि मुंबईतील तज्ज्ञ टीम आम्ही सलग अनेक तास बसून ही तयारी केली. या दरम्यान फोन माझ्याजवळ ( Medha Kulkarni News ) ठेवणे शक्य नसल्याने तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार, माझ्यावतीने माझ्या अन्य सहकाऱ्यांनी केला. आपल्या सर्वांशी बोलणे, भेटणे ही माझ्यासाठी ऊर्जा असते, पण या वेळी मात्र आपल्या फोनमधील आश्वासक, आनंदी शब्दांना ऐकायला मी मुकले. प्लीज प्लीज रागावू नका कोणी... तुमच्या सर्वांच्या फोनची नोंद घेतली गेली आहे. आणि दोन दिवसांनी दिल्लीला जाऊन आल्यावर आपण परत संपर्क केलात तर नक्कीच बोलू शकेन, असे आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केले.

R

Medha Kulkarni News
Pune BJP Political News: कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीमुळे कोणाचा झाला 'गेम'! लोकसभेचीही गणिते बदलणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com