Pune BJP Political News: कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीमुळे कोणाचा झाला 'गेम'! लोकसभेचीही गणिते बदलणार

Rajya Sabha Election 2024 : भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत अखेरच्या क्षणी मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर केले.
Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish Mulik
Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish MulikSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यसभेच्या उमेदवार म्हणून भाजपने माजी आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांचे नाव जाहीर केले आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत कुलकर्णी यांचे नाव आल्याने भाजपामधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काहींची चांगलीच अडचण झाली आहे.

भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत अखेरच्या क्षणी मेधा कुलकर्णी यांचे नाव राज्यसभेच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. यामुळे भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची गणिते बिघडली आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक झालीच नाही.

Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish Mulik
CM Eknath Shinde : कार्यकर्ता मेळावा औटघटकेवर, अन् मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौराच नाही !

या जागेवर आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या नावाचा समावेश आहे.

राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे नाव जाहीर केल्याने भाजपकडून ब्राह्मण समाजावर अन्याय होतो, अशी टीका आता कोणालाही करता येणार नाही. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपने ब्राह्मण समाजाला डावलल्याची टीका केली जात होती.

मात्र, कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले सुनील देवधर यांचे समीकरण बिघडले आहे. राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केल्याने लोकसभेसाठी आता ब्राह्मण उमेदवार दिलाच जाईल असे नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूडमधील आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्याच भागातील उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांचे उमेदवारीचे ' चान्सेस ' कमी झाले आहेत. तर दुसरे इच्छूक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची संधी वाढली आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मुळीक हे माजी आमदार आहेत. त्यांचे भाजपमधील अनेकांशी चांगले संबंध आहेत. याचा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरे असे की, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन कोथरूडचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील आपला मतदारसंघ ' सेफ ' करून ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish Mulik
Rajya Sabha Election 2024 : जावडेकर आता काय करणार? शेवटच्या भाषणातच दिले होते संकेत...

आता देखील मेधा कुलकर्णी यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव भाजप श्रेष्ठींकडून अंतिम करण्यात आले. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेतील जे इच्छुक आहेत त्यांना डावलून इतर काही नावे देखील पक्षाकडून पुढे येऊ शकतात, असा सूचक इशारा भाजपने यानिमित्ताने दिला असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत मेधा कुलकर्णी ?

प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.

विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिला मोर्चाच्या केंद्रीय समितीवर केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Muralidhar Mohol | Medha Kulkarni |Jagdish Mulik
Shiv Sena News : कल्याणचा दौरा होताच ठाकरेंना धक्का; माजी आमदाराची शिंदेंना साथ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com