NCP Sharad Pawar : पुण्यातील पराभूत उमेदवारांची थेट दिल्लीत शरद पवारांसोबत खलबत, काय झाली चर्चा?

Pune NCP Politics : दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम विरोधातील लढ्याची पुढची दिशा नेमकी कशी असणार याबाबतची चर्चा झाली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Dec : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत आहेत.

ईव्हीएम विरोधातील लढाईला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम विरोधातील लढ्याची पुढची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, अश्विनी कदम, सचिन दोडके अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप, अविनाश बागवे यांच्यासह नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी माहिती दिली ते म्हणाले, पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिल्लीत दाखल झाले आहेत. सकाळी शरद पवार यांच्या सहा जनपद येथील निवासस्थानी सर्व उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनुसिंगवी यांच्याशी चर्चा केली.

Sharad Pawar
Parliament Winter Session : संसदेत प्रियांका गांधींच्या बॅगची चर्चा; राहुल गांधींनाही भुरळ, लोकसभा अध्यक्ष का भडकले?

त्यानंतर आता सायंकाळी साडेआठ वाजता अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनुसिंगवी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मशीन कशाप्रकारे प्रोग्रॅम केल्या जातात. ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दिल्यानंतर देखील मॉक पोलच्या नावाखाली कशाप्रकारे उमेदवारांची फसवणूक केली जाते याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम बाबत जे जजमेंट दिलं आहे. त्यामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतदान मोजण्यात यावं असा निर्णय असूनही केंद्र सरकारच्या इशारावर निवडणूक आयोग आम्हाला फसवत आहे.

Sharad Pawar
Gulabrao Deokar : माजी मंत्री गुलाबरावांना राष्ट्रवादीत घेण्यास पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध, कार्यालयाबाहेर लावले प्रवेशबंदीचे फलक

या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असून त्या दृष्टिकोनातून आज सायंकाळची बैठक महत्त्वाची आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्येही ईव्हीएम विरोधाची लढाई सुरू राहणार असून त्यासोबतच घरोघरी जाऊन आम्ही ईव्हीएमविरोधात लढा उभारणार आहोत, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com