Parliament Winter Session : संसदेत प्रियांका गांधींच्या बॅगची चर्चा; राहुल गांधींनाही भुरळ, लोकसभा अध्यक्ष का भडकले?

Congress Targets Adani in Winter Session Debate : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदारांकडून सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Priyanka Gandhi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेस नेत्या व वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी आता संसदेच्या अधिवेशनात सक्रीय सहभागी होत आहेत. त्यांना अद्याप संसदेत भाषणाची संधी मिळाली नसली तरी काँग्रेस पक्षाकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्यांवरून लोकसभेतील सदस्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. संसदेच्या आवारातील आंदोलनातही त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरत असून आज त्याचीच आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली.

संसदेत येताना प्रियांका गांधी एक खास बॅग घेऊन आल्या होत्या. ही बॅग पाहून काँग्रेसच्या इतर नेत्यांप्रमाणे लोकसभेतील विरोधी पक्षनेते व त्यांचे बंधू राहुल गांधी यांना भुरळ पडली. या बॅगचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यावर एका बाजूला मोदी-अदानी भाई-भाई’ असे लिहिले होते. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो होते.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Shaktikanta Das : RBI मधील शेवटच्या दिवशी शक्तिकांत दास यांची मोदी, सीतारमण यांच्याविषयी पोस्ट; म्हणाले...

संसदेच्या आवारात राहुल गांधी यांनी बॅग पाहिल्यानंतर ‘क्यूट’ असल्याचे म्हटले. तसेच डिझाईन कुणी, अशीही विचारणा केली. अशाच बॅगा घेऊन काँग्रेस खासदारांनी संसदेत आंदोलनही केले. सोमवारी संसदेच्या आवारात काँग्रेसच्या दोन खासदारांनी पंतप्रधान मोदी आणि अदानींचे मुखवटे घातले होते. राहुल गांधी यांनी त्यांची प्रतिकात्मक मुलाखतही घेतली होती.

गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील कोर्टात कथित फसवणूक व लाचप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेसकडून पहिल्या दिवसापासून केली जात आहे. त्यावरून सातत्याने संसदेचे कामकाज तहकूब करावे लागत आहे. सत्ताधारी खासदारांकडूनही अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोसशी काँग्रेसच्या संबंधांचा मुद्दा पुढे करत प्रत्युत्तर दिले जात आहे.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Parliament Winter Session : हरयाणा, महाराष्ट्रातील विजयाने मोदी सरकारचा कॉन्फिडन्स वाढला; संसदेत 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार

ओम बिर्ला संतापले

दरम्यान, सातत्याने ससंदेचे कामकाज स्थगित करावे लागत असल्याने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी संतापले. ते म्हणाले, संसद हे एक पवित्र स्थान आहे. उच्च प्रतिष्ठा आणि मर्यादा आहे. याच संसदेत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. संसदेत देशाच्या आकांक्षा पूर्ण केल्या जातात. सहमती, असहमती ही लोकशाहीची परंपरा राहिली आहे.

मागील काही दिवसांपासून संसद परिसरात ज्याप्रकारे आंदोलन, नारेबाजी, फलक, मुखवट्यांचा वापर केला जात आहे, ते अशोभनीय आहे. तसेच संदीय पंरपरेच्या विपरीत आहे. यामध्ये विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांचे वागणेही आपत्तीजनक असल्याचे सांगत बिर्लांनी आपला संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com