Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींचा 'या' नावानेच उल्लेख करा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सल्ला

Political News : मोदी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी काही विरोधी नेत्यांची अपमानास्पद नावे घेऊन खिल्ली उडवली आहे.
Narendra modi, Prakash Ambedkar
Narendra modi, Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Pune : इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा अजून समावेश झालेला नाही. मात्र, आपण इंडिया आघाडीच्या मदतीसाठी आपण पुढे आलो आहोत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मोदी विरोधकांना कुठल्या ना कुठल्या नावाने संबोधित करून त्यांचा पाणउतारा करत असतात. त्यामुळे मोदींचा देखील असाच उल्लेख करावा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीला दिला असून त्यासाठी मोदींचा उल्लेख करण्यासाठी त्यांनी एक शब्द देखील सुचवला आहे.

Narendra modi, Prakash Ambedkar
Solapur Gadda Yatra : सिद्धरामेश्वरांच्या विवाह सोहळ्यास निवडणुकीची किनार...

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ट्विटरच्या माध्यमातून मालदीव - भारत विषयावर टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra modi) निशाणा साधला होता. यात त्यांनी मोदींचा 'घोंचू' म्हणून शब्दोल्लेख केला होता. याच पार्श्वभुमीवर पुन्हा एक ट्विट केले आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी काही विरोधी नेत्यांची अपमानास्पद नावे घेऊन खिल्ली उडवली आहे. काल मी मोदींना 'घोंचू' म्हटले. इंडिया आघाडीने हा शब्द घ्यावा आणि एकत्रीत पणे त्यांना 'घोंचू' म्हणा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी वारंवार पत्र पाठवून ही तुम्ही अजूनही आमचा पक्ष (वंचित बहुजन आघाडी) चा समावेश करून घेऊ शकला नाही, तरी आम्ही तुम्हाला मदत करू, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वंचित' लवकरच महाविकास आघाडीत

वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडित अजून झाला नाही. मात्र, वंचितच्या समावेशाबद्दल आघाडीतील सर्वच नेते सकारात्मक आहेत. लवकरच वंचितच्या समावेश होईल, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. शरद पवार यांनी देखील वंचितच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच वंचितचा समावेश महाविकास आघाडीत होईल, असे सांगण्यात येत आहे.

Narendra modi, Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आठवले कोणते काव्य रचणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com