
Pune News : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी (दि.25) एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पण घटनेला 48 तास उलटून झाले असले तरी अद्याप आरोपी दत्ता गाडेला शोधण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.या घटनेवरुन विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहेत. अशातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचाप प्रकरणावर भाष्य करताना असंवेदनशील विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जहाल शब्दांत कदमांना झापलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी गुरुवारी (ता.27) स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना पोलिसांची बाजूहू सावरली. पण त्यांनी यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता राजकारण तापलं आहे. कदम यांनी स्वारगेटमधील घटना शांततेत घडली. पीडित तरुणी ओरडली का नाही? असा सवाल मंत्री योगेश कदम यांनी केला आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कदमांना तिखट शब्दांत चांगलंच झापलं आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना धारेवर धरलं आहे.वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,पुणे-स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? असा संतप्त सवाल केला आहे.
स्वारगेटमध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही,म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे.विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे,आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी योगेश कदमांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता.
वडेट्टीवार यांनी कदमांना खडेबोल सुनावतानाच महायुती सरकारवरही टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील महिलांना लाडक्या बहीण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलांना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का? अशी संतप्त विचारणाही वडेट्टीवार करुन दाखवली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधताना आश्चर्यकारक विधान केलं. ते म्हणाले,स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेच्यावेळी जबरदस्ती,हाणामारी किंवा आरडाओरडा झालेला नाही. जे काही घडले ते सर्व काही शांततेत झाले. त्यावेळी बसच्या जवळपास 10 ते 15 जण बसच्या आसपास उभे होते. कोणालाही त्याची शंका आली नाही. त्यामुळे कदाचित आरोपीला कृत्य करण्यास आधार मिळाला.आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीत अधिक माहिती मिळेल,असे आश्चर्यकारक विधान कदम यांनी केले आहे.
घटनेच्या दिवशी मध्यरात्री पोलिस निरीक्षक आणि त्यांचे पथक मध्यरात्री दीड आणि तीनच्या सुमारास बसस्थानकाच्या आवारात पाहणी करून गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले आहे. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही? असं योगेश कदम यांनी केला आहे, असंही ते म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.