Abdul Sattar News : महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांनी दिल्या मतदारसंघातील सगळ्या मंदिरांना भेटी ! पण संकट टळेल का ?

On the occasion of Mahashivratri, MLA Abdul Sattar seeks divine blessings, raising questions about whether the political crisis will be averted. : अब्दुल सत्तार हे अवघ्या 2420 मतांनी निवडून आले. निवडणुकीपूर्वी आपले मताधिक्य लाखावर असेल असा दावा केला होता. परंतु मतदारसंघात त्यांच्याविरोधात असलेल्या लाटेत सत्तार यांचा दावा फोल ठरला.
MLA Abdul Sattar News
MLA Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड-सोयगाव सारख्या बहुजन समाजाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत. एक अल्पसंख्याक समाजातून आलेला नेत गेल्या 25-30 वर्षापासून आपले वर्चस्व कसे कायम राखून आहे? याबद्दल विरोधकही आश्चर्य व्यक्त करतात. पण सर्व धर्मीयांना सोबत घेतल्यामुळेच ते सातत्याने निवडून आले आणि राज्यात चार वेळा मंत्रीही झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात.

काल देशभरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी या निमित्ताने मतदारसंघातील बहुताश महादेव मंदिरांना भेटी देत भाविकांची विचारपूस केली. अगदी सकाळपासून सत्तार यांचे मतदारसंघातील मंदिरांना भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार हे अवघ्या 2420 मतांनी निवडून आले. निवडणुकीपूर्वी आपले मताधिक्य लाखावर असेल असा दावा केला होता. परंतु मतदारसंघात त्यांच्याविरोधात असलेल्या लाटेत सत्तार यांचा दावा फोल ठरला.

विजयासाठी त्यांना प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्याशी झुंजावे लागले. यातून सत्तार यांनी चांगलाच धडा घेतल्याचे त्यांच्या गेल्या दीड महिन्यातील एकूणच देहबोलीवरून दिसून आले आहे. (Shivsena) नव्या सरकारमध्ये मंत्री पद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार सध्या आपला सगळा वेळ हा मतदारसंघातच घालवत आहेत. शिवसेना नेते, पक्षाच्या कार्यक्रमातही सत्तार फारसे दिसत नाहीत. या मागे त्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे असलेली नाराजी हे कारण सांगितले जाते.

MLA Abdul Sattar News
Abdul Sattar V/S Sanjay Shirsat : अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली वीस कोटींची कामे पालकमंत्री शिरसाट यांच्याकडून रद्द!

अडीच वर्षांनी आपल्या पुन्हा संधी मिळेल आणि मंत्री म्हणून पुन्हा येईल असा दावा सत्तार सध्या करतांना दिसतात. मतदारसंघात कोट्यावधींचा निधी, प्रकल्प, योजना आणूनही आपला विजय काठावर झाला याचे शल्य सत्तार यांना आहे. या उद्विग्नेतूनच आपण पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. सध्या सत्तार हे राजकीय संकटात असल्याचे चित्र आहे.

MLA Abdul Sattar News
Eknath Shinde ShivSena : भलतेच नखरे! 'त्या' माजी आमदाराची पक्षात येण्यासाठी शिंदेंकडे भरमसाठ डिमांड

कृषीमंत्री असतांना सत्तार यांच्या ओएसडीने त्रास देत देवाणघेवाणीसाठी दबाव आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नुकताच केला. या शिवाय त्यांच्या काळात मंत्री म्हणून घेण्यात आलेले अनेक निर्णय आणि त्यांची चौकशी सरकारने लावण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्री असताना मतदारसंघात मंजूर करुन आणलेली एमआयडीसी, सिंचनाचे प्रकल्प रद्द झाले, तर काही कायद्याच्या कचट्यात अडकले.

MLA Abdul Sattar News
Eknath Shinde : "ते व्यासपीठ चुकीचं होतं की..." नीलम गोऱ्हेंच्या 'मर्सिडीज' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

चार महिन्यासाठी मिळालेल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय, कामांना दिलेली मंजूरीही नवे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रद्द केली. एकूणच आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात कधीही हार न मानणाऱ्या अब्दुल सत्तार यांची सध्या पुर्ती कोंडी झाली आहे. अनेक राजकीय शत्रू निर्माण झाल्याने अब्दुल सत्तार यांच्या मागे संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. अशावेळी त्यांनी आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू केल्याचे त्यांच्या कालच्या मंदिर भेटीगाठीवरून दिसू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com