Anna Bansode : आमदार बनसोडेंचा सरकारला घरचा आहेर; '1 हजार कोटीचा घोटाळा' सोमय्यांकडे सोपवला...

MLA Anna Bansode News : एकप्रकारे थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच बनसोडेंनी शिंगावर घेण्याचे धाडस केले आहे.
MLA Anna Bansode News
MLA Anna Bansode NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : भ्रष्टाचाराविरद्ध आवाज उठवून त्यावर राज्याचंच नाही, तर केंद्रातील यंत्रणांकडून चौकशी लावणारे, अशी प्रतिमा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आहे. त्यांच्यामुळे ठाकरे शिवसेनेचे अनेक नेते कायद्याच्या कचाट्यातही सापडले आहेत.

त्यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कोरोना घोटाळ्याबाबत नुकताच मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सोमय्यांची ही 'किर्ती' ऐकून चक्क महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही त्यांच्याकडे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण सोपवले आहे. (Latest Marathi News)

MLA Anna Bansode News
NCP News : ...म्हणून मावळात राष्ट्रवादीला पाच महिन्यांपासून अध्यक्षच नाही!

राज्य सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार कोटी रुपयांच्या या टेंडरमधील घोटाळ्याचे हे प्रकरण सोमय्यांकडे सोपवून बनसोडेंनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच, त्यातून त्यांनी सोमय्यांचीही गोची केली आहे. कारण त्यांना आपला पक्ष सत्तेत असलेल्या युती सरकाविरुद्धच कारवाईची मागणी करावी लागणार आहे.

त्यामुळे ते हे प्रकरण इतर भ्रष्टाचाराच्या ठाकरे शिवसेना नेत्यांविरुद्धच्या प्रकरणासारखे तडीस नेतील, अशी शक्यता मागील अनुभव जमेस धरता कमीच दिसते आहे. कारण भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांच्याकडे यापूर्वी तक्रार देऊनही त्यावर त्यांच्याकडून पुढील कारवाई झालेली नाही.

MLA Anna Bansode News
Pimpri Chinchwad News : निलंबित लाचखोरांना पिंपरी महापालिकेने पुन्हा घेतले कामावर, फडणवीसांचे नागपूरही चर्चेत आले

सामाजिक न्याय हे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. म्हणजे एकप्रकारे थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच बनसोडेंनी शिंगावर घेण्याचे धाडस केले आहे. शिंदे व बनसोडेंनी यापूर्वी मंत्रालय ते ठाणे (शिंदेचे खासगी निवासस्थान) असा शिंदेंच्या मोटारीतून एकत्र प्रवास केल्याने त्याची चर्चा झाली होती, तर पिंपरी दौऱ्यात शिंदेंनी बनसोडेंच्या कार्यालयाला आवर्जून भेट दिल्याने राष्ट्रवादीत नाराज असलेले बनसोडे शिवसेनेत जाण्याची वावटळही उठली होती.

ईडी चौकशी सुरू असलेल्या कंपनीला काम?

घोटाळा झालेले हे टेंडर रद्द करण्यासाठी आमदार बनसोडे गेल्या सव्वा वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. प्रथम या विभागाचे सचिव, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी गेल्यावर्षी २२ ऑगस्टला तक्रारीचा मेल केला, पण आमदारांनी तक्रार देऊनही त्याची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी यावर्षी थेट 'पीएमओ' म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात धाव घेतली. पण, त्यावरही अॅक्शन घेण्यात आली नाही.

उलट या महिन्याच्या सहा तारखेला हे काम ईडी चौकशी सुरू असलेल्या वादग्रस्त 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला देण्यात आले. त्यानंतर शेवटचा उपाय म्हणून बनसोडेंनी सोमय्यांच्या 'कोर्टा'त धाव घेतली. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडेल, अशी दाट शक्यता आहे.

MLA Anna Bansode News
Shirdi Lok Sabha Seat : शिंदे शिवसेना खासदाराच्या लोकसभा जागेवर बावनकुळेंचा डोळा ? भाजपचा जंगी प्रचार...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे हे टेंडर ?

सामाजिक न्याय विभागाची साडेचारशे वसतिगृह आणि शंभर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भोजन व दूधपुरवठा करण्याचे हे एक हजार कोटी रुपयांचे टेंडर गेल्या वर्षी २६ जुलैला काढण्यात आले. सत्ताधारी नेत्यांच्या कंपनीलाच ते मिळेल, अशा त्याच्या अटी व शर्ती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी चंद्रकांत गायकवाड या एजंटच्या मध्यस्थीने तयार केल्याचा बनसोडेंचा दावा आहे.

त्यातून काही ठराविक ठेकेदारांनी रिंग करून हे टेंडर भरले. तेच पात्र ठरले. शेवटी त्याच ठेकेदाराला हे टेंडर बहाल केले, असा बनसोडेंचा आरोप आहे. म्हणून ते रद्द करून याबाबतच नाही, तर सामाजिक न्याय विभागात गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या लुटीची चौकशी एसआयटी, सीबीआय व ईडीमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com