Pune NCP News: ज्येष्ठ नेते शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी आज (ता. ७ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गटातील आमदार हे अजितदादांच्या गळाला लागले आहेत की काय, अशी चर्चा रंगली आहे. (MLA from Sharad Pawar group meet Ajit Dada)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ३५ ते ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. दादांच्या बंडानंतर शरद पवार यांच्यासोबत मोजकेच आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यात पुण्यातील हडपसरचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांचा समावेश आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्यात आहेत. जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी अजित पवार यांची आमदार चेतन तुपे यांनी भेट घेतली आहे. भेटायला आल्यानंतर तेथील उपस्थितांनी त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. या भेटीसंदर्भात आमदार तुपे यांनी ‘माझं एक काम होतं. त्यासाठी अजित पवार यांना भेटायला आलो आहे,’ असे सांगितले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही आमदार चेतन तुपे हे गैरहजर होते. त्या काळात ते आजारी होते, त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तुपे यांनी रुग्णालयातूनच एक व्हिडिओ व्हायरल करून आजारी असल्यामुळे आपल्याला अधिवेशनाला हजर राहता येणार नाही, असे सांगितले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालयाची धुरा आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पवार यांच्या गोटातील आमदारांमध्ये चलबिचल वाढली आहे. त्यातील अनेक जण अजित पवार गोटाच्या मार्गावर असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.