Hemant Rasane : 'कोणी किती बी येऊ द्या, पुण्यात फक्त भाजपच', आमदार रासनेंचा शिवसेनेला टोला

Hemant Rasane BJP : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाची ताकद वाढवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar
Hemant Rasane Vs Ravindra Dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Hemant Rasane News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाची ताकद वाढवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत शिवसेनेकडून मिशन टायगर राबविण्यात येत असून या माध्यमातून पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडून आणण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची ताकद वाढल्याचे राजकीय ताकद वाढत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी पुण्यात भाजप वगळता इतर कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद नाही, असे मत भाजप आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.

गेले काही दिवसांपासून पुणे शहरातील पक्षांतराचा केंद्रबिंदू हा कसबा विधानसभा मतदारसंघ राहिला आहे. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातील दोन माजी नगरसेवकांचा समावेश होता.

या पक्षप्रवेशानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि काही या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar
Sanjay Shirsat News : समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगरमध्येच पाच वसतीगृहांची वीज बील न भरल्याने कट!

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ताकद वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. असे असले तरी पुणे शहरांमध्ये भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाची ताकद आपल्याला दिसत नाही, असे वक्तव्य भाजप आमदार हेमंत रासने यांनी केले आहे.

विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाबाबत विचारला असता हेमंत रासने म्हणाले, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कोण नेते आहेत ? कसब्यामध्ये भाजप वगळता कोणाची ताकद नाही. पॉलिटिकल ताकद मोजण्याचा एक पॅरामीटर असतो. महापालिकेमध्ये तुमच्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत. शहरांमध्ये किती आमदार आहेत. यानुसार एखाद्या पक्षाची ताकद ठरते मात्र सध्या आमच्या पॅरामीटर नुसार इतर कोणत्याच पक्षाची ताकद आम्हाला दिसत नाही.

महायुतीच्या निकषानुसार ज्या पक्षाची ज्या ठिकाणी ताकद आहे. तिथे इतर मित्रपक्ष त्याच्या सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये असतात.पुण्यामध्ये फक्त भाजपाची ताकद आहे. त्यामुळे इतर महायुतीतील मित्र पक्षांना आम्ही बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेत असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं.

Hemant Rasane Vs Ravindra Dhangekar
Pandharpur Corridor : पंढरपुरातून देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काॅरिडाॅरचे काम पुढील तीन महिन्यांत सुरू होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com