Ajit Pawar: शिवसेना नेत्यांच्या टार्गेटवर तटकरे का? अजितदादांनी सांगितलं कारण

Shiv Sena MLA Mahendra Thorve accuses Minister Aditi Tatkare: आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे कुटुंबांवर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले नंतर ती जमीन तटकरे कुटुंबाने विकत घेतली, असा आरोप थोरवे यांनी केला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर आदिती तटकरे यांच्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळालं.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष आमने-सामने आल्याचा पाहायला मिळालं. त्यानंतरच्या काळात देखील या दोन्ही महायुतील मित्र पक्षांमध्ये सातत्याने संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.

नुकतेच शिंदे यांच्या पक्षाचे नेते असलेल्या भरत गोगावले यांच्याबाबतचा एक व्हिडिओ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने ट्विट करत गंभीर आरोप केले होते. या व्हिडिओच्या अनुषंगाने भरत गोगावले हे आघोरी पूजा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून भरत गोगावले यांना घेरण्याचा प्रयत्न होत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेने कडून देखील आदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Ajit Pawar
Israel Iran War: अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला; काय आहे बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स, जाणून घ्या!

कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे कुटुंबांवर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहा तालुक्यातील दुरटोली गावा जवळील एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले नंतर ती जमीन तटकरे कुटुंबाने विकत घेतली, असा आरोप थोरवे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आदिती तटकरे यांचा राजीनामा देखील मागितला आहे. यानंतर या सर्व आरोपांवर अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

बारामती मध्ये माध्यमांशी बोलताना या बाबत अजित पवार म्हणाले, कुणावर आरोप केल्यानंतर त्या आरोपाचे पुरावे द्यावी लागतात. त्या आरोपांबाबत पुरावे दिल्यानंतर त्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी केली जाते. आणि चौकशीनंतर खरी वस्तुस्थिती समोर येते.

राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचे आरोप अनेकांवर यापूर्वी देखील झाली आहेत आणि चौकशी अंतिम त्याबाबतची वस्तुस्थिती देखील समोर आली आहे.बऱ्याच वेळी स्थानिक वाद असतात आणि त्यातून कोणातरी टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातून अशी आरोप केले जातात. आत्ता आदिती तटकरे या महिला बाल कल्याण विभागाचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे तिला मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची शक्यता आहे असं अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com