Mauli Katke Vs Ashok Pawar : शिरुरचे आजी-माजी आमदार मतदान केंद्रावर भिडले, माऊली कटके म्हणाले, 'पराभव दिसायला...'

Shirur Municipal council Election : शिरुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार आणि आमदार माऊली कटके हे एका मतदार केंद्राच्या बाहेर भिडले.
MLA Maul Katke and Ashok Pawar clash at a Shirur polling booth during Nagar Panchayat elections.
MLA Maul Katke and Ashok Pawar clash at a Shirur polling booth during Nagar Panchayat elections.sarkarnam
Published on
Updated on

Pune News : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांचे अनेक स्थानिक नेते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. अशीच शाब्दिक चकमक पुणे जिल्ह्यात देखील झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माऊली कटके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार अशोक पवार यांच्यात वाद झाल्याचं पाहिला मिळाला.

शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरून ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व अशोक पवार या आजी - माजी आमदारांत शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी ही घटना घडली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

दोन दिवसांपूर्वीच आमदार माऊली कटके यांच्या गाडीने एका चिमुकलेला उडवलं होतं त्यानंतर आमदार अशोक पवार आक्रमक झाले होते. त्यानंतर काल मतदान केंद्रात जाण्यावरून आमदारांना हटकल्यानंतर पराभव दिसायला लागल्याने हायपर होऊ नका असं आमदार माऊली कटकेने माजी आमदार अशोक पवारांना मतदान केंद्राबाहेर ऐकवलं.

दरम्यान आमदार कटके यांनी मतदाना दिवशी शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची तसेच मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी ते काही मतदान केंद्रात जाऊन माहिती घेत असल्याचे पवार यांना समजले त्यानंतर आमदार उर्दू शाळेजवळील मतदान केंद्रात गेल्याचे आपल्या कार्यकर्त्यांकडून समजताच अशोक पवार यांनी या मतदान केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

MLA Maul Katke and Ashok Pawar clash at a Shirur polling booth during Nagar Panchayat elections.
Shivsena Politics: संजय शिरसाटांशी अबोला, भाजप शहराध्यक्षांशी दोन दोन तास गप्पा; शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मनात नेमकं काय?

आमदार कटके मतदान केंद्रातून बाहेर येताच पवार यांनी त्यांना या कृत्याचा जाब विचारला. पवार म्हणाले, तुम्हाला कायद्याने मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण एक लोकप्रतिनिधी असून, तुम्हाला हे बेकायदा कृत्य करणे पटते का, प्रत्येक मतदान केंद्रात जावून पाहणी करणे योग्य आहे का, असा सवाल केला.

त्यावर कटके म्हणाले की, आपण बाजूला या चर्चा करू, त्यावर पवार यांनी तुम्ही आत का? गेला याचे उत्तर द्या, असा तगादा लावत या घटनेचे व्हिडिओ चित्रण करा, असे कार्यकर्त्यांना सूचित केले. मतदान केंद्राधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना बोलवा, असे ते म्हटले त्यावर माऊली कटके यांनी, तुम्ही चिडू नका, रागावू नका, हायपर होऊ नका, पवार यांना सांगितले.

सीसीटिव्ही तपासा...

पवार यांनी आपण आमदार आहात, कायदा पाळा, नीट वागा असा सल्ला दिल्याने आमदार कटके काहीसे संतप्त झाले. पराभव दिसायला लागल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली का? काय सीसीटीव्ही चित्रण तपासाचे ते तपास म्हणत ते निघून गेले. माजी आमदार मध्ये झालेली ही शाब्दिक चकमक परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

MLA Maul Katke and Ashok Pawar clash at a Shirur polling booth during Nagar Panchayat elections.
Devendra Fadnavis Meets Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- संजय राऊत यांची भेट, तब्बल 20 मिनिट चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com