Ravindra Dhangekar News : मी पोलिसांना सांगितलं होतं, पुण्याचा पंजाब होतोय, कोण म्हणाले असे...!

Congress MLA Ravindra Dhangekar serious allegation that pubs in Pune have become dens of drugs : पुण्यातील पब बनलेत अमली पदार्थांचे अड्डे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप
Ravindra Dhangekar on Drugs News
Ravindra Dhangekar on Drugs NewsSarkarnama

Pune News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण कुठे थंड होतं ना होतं. तोच आता आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा पुणे शहरात झाला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आता या ड्रग्ज प्रकरणावरून सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत धंगेकर यांनी मीडियाशी संवाद साधला ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी शहरांमध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झालाय. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती परिसरातील सोमवार पेठ भागातील एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी मधील कारखाना उघडकीस आला असून, या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar on Drugs News
Pune Drug Racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचे पंजाब कनेक्शन; मास्टर माइंड कुटुंबासह इंग्लंडमध्ये

मी ललित पाटील प्रकरणाबाबत वारंवार पोलिसांशी बोलत आलो आहे. तरीदेखील राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास पूर्णपणे केलेला नाही. या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांनी ज्या पद्धतीने ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणामधील बाकीच्या लोकांना अटक करण्यात आली. मात्र, संजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घालत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

या प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित खात्याचे मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना पाठवला होता. मात्र, या प्रकरणांमध्ये सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे, हे स्पष्ट झाला असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. सध्याचे सरकार हे याच संस्कृतीला पाठिंबा देत असून, यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत आहेत.

Ravindra Dhangekar on Drugs News
Lok Sabha Election 2024 : निम्मी काँग्रेस चव्हाणांसोबत भाजपमध्ये; मग जिंकण्याचा दावा कशाच्या जोरावर ?

ललित पाटील प्रकरणादरम्यान मी पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याच्या शक्यतेबाबत कल्पना दिली होती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र पंजाब नंतर ज्या अमली पदार्थामुळे व्यसनाधीन होत असल्याबाबतची कल्पना पोलिसांना दिली होती. हे ड्रग्ज रॅकेट सोमवार पेठपर्यंत पोहोचले असून, एक नाहीतर अनेक ललित पाटील यामध्ये सक्रिय आहेत. पुणे शहरामध्ये पब संस्कृती वाढत असून, हे पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे बनले आहेत. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराची पाळंमुळं खोलवर रुजली असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. इतके मोठे रॅकेट पुणे परिसरामध्ये सुरू असताना याचा साधा सुगावा पोलिसांना न लागवा हे पोलिसांचे अपयश असून, पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचं धंगेकर म्हणाले.

Edited By : Chaitanya Machale

R

Ravindra Dhangekar on Drugs News
Pune Politics News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला धमकी; जगताप यांची पोलिसांत धाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com