Talathi Exams News : नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या भरतीच्या परीक्षेचेही पेपर फुटले. कर्मचारीच उत्तरपत्रिकेची कॉपी तीन लाख रुपयांच्या बदल्यात पुरवित असल्याचेही आढळले. एवढेच नाही, तर पेपरफुटीप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या राजू नागरेसाठी थेट मंत्रालयातून पोलिसांना फोन गेले. एकूणच या सरकारी नोकर भरतीतील अनागोंदी कारभारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) जाम भडकले आहेत.
तलाठीसह त्याअगोदर झालेल्या पोलिस (Police) आणि वनरक्षक पदाच्या भरतीतही लाखोंचा भाव फुटला होता. सध्या राज्यात महायुती सरकारचा "शासन आपल्या दारी" हा उपक्रम सुरू आहे. त्याचा आधार घेत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शासन भ्रष्टाचारी, आलेय आपल्या दारी असा हल्लाबोल सरकारी नोकरभरतीतील भोंगळ कारभारावर केला.
पेपरफुटीमुळे राज्यातील युवावर्ग हतबल झाला असून, तरीही दुर्दैवाने राज्य सरकार सीरियस नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी तोफ त्यांनी डागली. विद्यार्थी सीरियसपणे वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत आहेत. त्यासाठी पैसे उसने घेऊन ते हजारो रुपयांची फी देत आहेत. अभ्यास करून घरापासून कित्येक किलोमीटर दूरवरील परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षासुद्धा देत आहेत.
मात्र, हे सर्व करून पेपरफुटी होत असल्यामुळे आपल्याला संधी मिळेल की नाही याची शाश्वती त्यांना नाही, अशी त्यांची कैफियत रोहित पवारांनी सीरियसली बुधवारी मांडली. पण, राज्य सरकार सीरियस नसल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये खेदपूर्वक नमूद केले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.