Maval News : 'कार्यक्षम' मुख्याधिकाऱ्यांची बदली करा; आमदार सुनील शेळकेंच्या मागणीने भुवया उंचावल्या

Sunil Shelke News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा खेळ सुरू असून, गेल्या सव्वा दोन वर्षांत चार सीओंची बदली झाली आहे.
Sunil Shelke, N. K. Patil
Sunil Shelke, N. K. PatilSarkarnama

Pimpri-Chinchwad News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या (सीओ) बदलीचा खेळ सुरू असून, गेल्या सव्वा दोन वर्षांत चार सीओंची बदली झाली आहे. या मुदतपूर्व बदली सत्रामुळे कुणाही सीओला आपल्या कामाचा ठसा उमटविता आलेला नाही. अशा स्थितीत आता विद्यमान सीओ एन. के. पाटील यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. कारण तशी मागणीच राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP), स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केली आहे.

शिंदे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रींरग बारणे (Shrirang Barne) यांनी पाटील यांना सीओ म्हणून तळेगावात सोलापूर येथून आणल्याची चर्चा झाली होती, तर ते 'अकार्यक्षम' असल्याचा टोला लगावत त्यांच्या बदलीची मागणी आता शेळकेंनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. त्यावर आपण कसे कार्यक्षम आहोत, याचा पाढा पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना वाचला. तसेच अगोदरच्या सीओंचा कारभार कसा भोंगळ होता, व्यवस्था कशी ढासळली होती, त्याची उदाहरणेही दिली. आपल्या बदलीच्या शेळकेंनी केलेल्या मागणीवर राज्य सरकार काय तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

Sunil Shelke, N. K. Patil
Ajit Pawar Satara Tour : अजित पवारांचे सातारच्या सीमेवर जंगी स्वागत; गर्दी पाहून धनंजय मुंडे गाडीतच बसले

तळेगावचे अगोदरचे सीओ विजयकुमार सरनाईक यांची नगरविकास विभागाने सहाच महिन्यांत या वर्षी २१ एप्रिलला पाटील यांच्या जागी सोलापूरला बदली केली होती. मात्र, पाच महिन्यांतच पाटील यांच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी शेळकेंकडे गेल्या. त्यात वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संताप व्यक्त केलेला आहे.

Sunil Shelke, N. K. Patil
Chandrapur Congress Jansamvad Yatra : बोडलावारांच्या भंगाराम तळोधीत कॉंग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

तसेच मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेच्या तक्रारी घेऊन तळेगावकर हा नगरपालिकेमध्ये आल्यावर या गंभीर प्रश्नी सीओंकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचाही त्यात आरोप आहे. त्या जोडीने स्वत: शेळकेही सीओंच्या कारभारावर समाधानी नाहीत. कारण शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेबाबत अनेक सूचना त्यांनी करूनही त्यावर सीओ उदासीन असल्याचे दिसून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच असमाधानकारक कार्यपद्धतीमुळे शेळकेंनी सीओंच्या बदलीची मागणी केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com