Raj Thackeray: राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद; कारणं जाणून घेणार

MNS Chief Raj Thackeray Visit to Pune:निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते देखील त्यांच्या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे.तर मनसेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट ही वाचवता आलं नाही. या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना अविश्वसनीय इतकीच प्रतिक्रिया दिली होती. या नंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते पुण्यातील पराभूत मनसे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांसोबत चिंतन करणार आहेत .

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लोकसभेला एकही उमेदवार न देता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार मनसेने केलं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुका मनसे महायुती सोबत लढवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र ही निवडणूक मनसेने स्वबळावर लढली. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी 128 जागांवर उमेदवार दिलेल्या मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. राज्यातील एखाद दोन उमेदवार वगळता कुठल्याही उमेदवाराला 50 हजाराहून अधिक मताधिक्य घेता आलं नाही. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले असल्याचे समोर आले आहे.

Raj Thackeray
Bachchu Kadu: 'बच्चू कडू को हमने गिराया' म्हणणाऱ्या राणा दापत्याची औकातच काढली! म्हणाले, "माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये"

मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला किमान एक तरी विधानसभेची जागा जिंकण्यात यश येत होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते देखील त्यांच्या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आज ते पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील पराभूत उमेदवारांसह शहर पदाधिकारी आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी ते निवडणुकीबाबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. या माध्यमातून राज ठाकरे हे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि पक्षाला नव संजीवनी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray
Eknath Shinde PC : मोदी, शहांना फोन, CM पदावरील दावा शिंदेंनी सोडला; फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा VIDEO पाहा

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.यानंतर ते पुण्यामध्ये आज मनसे शहर कार्यालयामध्ये बैठक घेणार आहेत. बैठकीला पुणे शहर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार उपस्थिती लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठकीनंतर राज ठाकरे पुण्यातून माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी अद्याप माध्यमांशी संवाद साधलेला नाही. निकाल वर प्रतिक्रिया देताना फक्त अविश्वसनीय इतकी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उडी घेतली आहे. या पार्श्वभूमी वर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com