
MNS demand, Men’s Commission Maharashtra : मराठीच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यात 'पुरुष आयोग' स्थापन करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
महिलांसाठी महिला आयोग कार्यरत असतानाच, सध्याच्या सामाजिक परिस्थितीत पुरुषांवर होणारा अन्याय, खोट्या तक्रारी आणि मानसिक छळ यामुळे पुरुषांसाठी स्वतंत्र आयोगाची गरज असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.
मनसेचे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, "राज्यात आणि देशात पुरुषांवर होणाऱ्या मानसिक अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. देशभरात पुरुषांच्या छळाचे प्रमाण ५१.५ टक्क्यांवर पोहोचल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. खोट्या केसेस, विनाकारण पोलिसी कारवाई आणि कौटुंबिक कलहांमध्ये पुरुषांना अकारण त्रास दिला जात आहे."
या पार्श्वभूमीवर, मनसेने राज्यात 'पुरुष आयोग' स्थापन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा अन्यायाविरोधात पुरुषांना आपल्या हक्कासाठी आवाज उठवता येईल. राज्य महिला आयोग ज्या प्रकारे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे, त्याच धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करून, पीडित पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, असे मनसेचे म्हणणे आहे.
या मागणीसंबंधी अधिकृत चर्चा करण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ आगामी ४-५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी शिष्टमंडळ या मागणीचा पुनरुच्चार करणार असून, तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणार आहे.
राज्यातील पुरुषांसाठी अशा प्रकारचा आयोग स्थापन करण्याबाबत अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या आहे. मात्र याबाबत पहिल्यांदाच भूमिका घेतली आहे त्यामुळे हा विषय आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.