Nilesh Ghare arrested : गोळीबाराचा बनाव करत स्वतःवरच हल्ल्याचा रचला कट; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Arrest of Nilesh Ghare: What Happened? : जाणून घ्या, शिवसेनेच्या युवासेनेचा पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे प्रकरणी काय खळबळजनक खुलासा झाला आहे?
Shiv Sena leader Nilesh Ghare's SUV, allegedly targeted in a staged firing incident in Pune's Warje area.
Shiv Sena leader Nilesh Ghare's SUV, allegedly targeted in a staged firing incident in Pune's Warje area. Sarkarnama
Published on
Updated on

Nilesh Ghare, fake attack case News : शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेच्या गाडीवर अज्ञात दोघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हे प्रकरण पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या गणपती माथा परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय वेगाने तपास केला. मात्र या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादाय माहिती आली आणि त्यानंतर मग पोलिसांनी ज्या युवासेना जिल्हाप्रमुखावरती गोळीबार झाला होता त्यालाच अटक केली आहे.

शिवसेनेचा पदाधिकारी असलेला निलेश घारे हा गणपती माथा येथे असलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता. त्याचवेळी  दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होत.

गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून तत्काळ पसार झाले होते. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा तपास सुरू केला होता. परिसरात नाकाबंदी ही केली होती, हल्लेखोर कोण होते, त्यामागे उद्देश काय होता? याचा देखील कसून तपास पोलिसांनी केला. शिवाय, गोळ्यांची संख्या आणि वापरलेल्या शस्त्रांबाबत अधिक माहिती गोळा केली गेली. हल्ला राजकीय द्वेषातून झाला की कोणत्या व्यक्तिगत कारणामुळे, याचा तपासही पोलिसांकडून केला जात होता. अखेर या पोलिसांच्या या सखोल तपासाअंत एक वेगळीच आणि धक्कादायक बाब समोर आली.

Shiv Sena leader Nilesh Ghare's SUV, allegedly targeted in a staged firing incident in Pune's Warje area.
Priya Phuke case : ''सुषमाताई, रोहिणीताईंनी राजकारण करण्यापेक्षा वाद सोडण्यासाठी प्रयत्न केले असते, तर..''

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनाव? -

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घारे याने काही महिन्यांपूर्वी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्याने पोलिस संरक्षण मिळावे आणि आपला जीव धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा संशय पोलिसांना होता.

Shiv Sena leader Nilesh Ghare's SUV, allegedly targeted in a staged firing incident in Pune's Warje area.
Donald Trump News : '..म्हणून कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनण्याचा विचार करत आहे'; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा!

याप्रकरणी सचिन गोळे, शुभम खेमणार, अजय उर्फ बगली सकपाळ या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा साथीदार संकेत मातले हा मात्र पसार झाला आहे. तर याबाबत निलेश राजेंद्र घारे याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. निलेश घारे हा शिवसेनेचा पुणे जिल्हा युवासेना प्रमुख असून वारजे भागातील गणपती माथा परिसरामध्ये त्याचे जनसंपर्क कार्यालय आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर या कटामध्ये निलेश घारे याचा देखील समावेश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता निलेश घारेला पोलिसांनी अटक केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com