Devendra fadnavis : पहिल्याच टर्मला मंत्रि‍पदाची लॉटरी; पण वर्षभरातच मिळवली अमित शहांची शाबासकी: फडणवीसांकडून मोहोळांचं तोंडभरून कौतुक

Mohol in Modi Government News : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या खासदारकीच्या वर्षपूर्तीच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Devendra Fadnavis, Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : चार दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत एका गाडीतून प्रवास केला. त्यावेळी शाह म्हणाले, 'आपका मोहोळ बहोत अच्छा मंत्री है. बहोत अच्छा काम करता है. ये पढकर आता है, इसका भविष्य बहोत उज्ज्वल है', या शब्दांत त्यांनी प्रशंसा केली. मोदी, शाह हे दोन्ही नेते कधीच कोणाला सर्टिफिकेट देत नाहीत. ते कधीच कोणाचे कौतुकही करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेले हे प्रशस्तिपत्रक पाहता तुमची ट्रेन अगदी योग्य पटरीवरून चालली असल्याचे कौतुक त्यांनी करीत अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या खासदारकीच्या वर्षपूर्तीच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मोहोळ करीत असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री यांच्यासह खासदार व आमदार उपस्थित होते.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
NCP Jayant Patil: मोठी बातमी: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली; जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुरलीधर मोहोळ चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला असलेली गर्दी पाहता हे लक्षात येत आहे. त्यांनी वर्षभरात केले हे काम फक्त ट्रेलर आहे. अजून पिक्चर बाकी आहे. अर्धे कार्यकर्ते सभागृहाबाहेर आहेत. त्यामुळे या पुढे मोठा कार्यक्रम घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Jayant Patil: तीन निवडणुकांमध्ये पराभव ते पक्षाची फूट : जयंत पाटलांच्या कारकि‍र्दीतच राष्ट्रवादीने गमावला 'राष्ट्रीय' पक्षाचा दर्जा

मी पुण्याला आलो तरी त्याची दाखल घेतली जाते. कोणी तरी परवा 30 दिवसात 9 वेळा मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) पुण्याला आले, असल्याची बातमी दिली आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम महत्वाचा आहे. एक वर्षाचा कार्यकाळाचा अहवाल प्रकाशित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याशिवाय 24 तास चालणारे कार्यालय त्यांनी सुरु केले आहे. त्याचे उदघाटन आज होत आहे, जनतेच्या मदतीसाठी सदैव सुरु राहणार हे अशा स्वरूपाचे पहिलेच कार्यालय असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
BJP News: नाशिकमधून मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्यावर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा, धक्कादायक कारण समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com