पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे येत्या सहा मार्च रोजी पुणे महापालिकेत येत आहेत. या आधी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पुणे पालिकेला 61 वर्षांपूर्वी भेट दिली होती. त्याच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.
पुमे महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सहा मार्चला होणार आहे. पुणे महापालिकेला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान की दुसरे याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. मोदी यांच्याआधी नेहरू यांनी भेट दिल्याच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला.
याबाबत माहिती देताना काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी सांगितले की नेहरू हे दोन वेळा पुणे महापालिकेत आले. पुण्यात 1960 मध्ये फर्ग्युसन काॅलेजच्या मैदानावर काॅंग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्या वेळी पंडित नेहरू पुण्यात आले होते. तत्कालीन महापौर रोहिदास किराड यांनी त्यांना महापालिकेत आणले होते. त्या वेळच्या छायाचित्रात नेहरू यांच्यासोबत राज्यपाल श्रीप्रकाश, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब खेडकर हे पण उपस्थित असल्याचे दिसत आहे.
नेहरू हे पानशेतचे धरण फुटल्यानंतर झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी देखील पुण्यात आले होते. त्या वेळी ते पुणे महापालिकेत गेले होते. या वृत्तात दिसणारे छायाचित्र हे पूराच्या परिस्थितीच्या वेळचे नाही, असे उल्हास पवार यांनी सांगितले. या छायाचित्रात महापौरांच्या पत्नी दिसत आहेत. पूर परिस्थितीच्या वेळी असा सत्कार किंवा समारंभ झाला नसेल. त्यामुळे हे छायाचित्र काॅंग्रेसच्या अधिवेशन सालातील म्हणजे 1960 मधील असल्याचे उल्हासदादांनी स्पष्ट केले. नेहरू हे 1955 मध्ये पुण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन महापौर राजाभाऊ तेलंग यांनी त्यांच्यासाठी राजभवन येथे भोजन ठेवले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली. पानशेत पूर आणि काॅंग्रेसचे अधिवेशन या दोन्ही वेळी रोहिदास किराड पुण्याचे महापौर होते. पुराची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नेहरू यांनी पुणे महापालिकेला भेट देत पालिकेच्या सभागृहात पूरस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण पुण्यातून उघड्या जीपमधून पूरस्थितीची पाहणी केल्याची आठवण रोहिदास किराड यांचे पुतणे व कॉंग्रेसचे माजी नगरसेवक विरेंद्र किराड यांनी सांगितली.
मोदींचा असा असेल दौरा
सहा मार्चला पुण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी सुरवातीला पालिकेत येणार आहेत. पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ‘मेट्रो’च्या उद्घटानासाठी ते कर्वे रोड येथे जाणार आहेत.कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयसमोरील स्टेशनमधून ते पौड रस्त्यावरील आनंदनगर येथील स्टेशनपर्यंत जाणार आहेत.त्यानंतर ‘एमआयटी’ संस्थेच्या मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन ‘ऑनलाइन’ पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित महापालिका भेटीने १९६१ सालच्या नेहरूंच्या पुणे भेटीच्या आठवणी समाज माध्यमावर आज ताज्या झाल्या.तत्कालिन पंतप्रधान नेहरूंच्या भेटीची छायाचित्रे व्हायरल झाली.मात्र,भेटीचा तपशील नव्या पिढीला फारसा माहीत नसल्याने नेहरूंची भेट नक्की कोणत्या वर्षी झाली याचीही चर्चा रंगली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.