मलिकांना देशद्रोही ठरविण्याच्या नादात दरेकर भूमिका बदलतात तेव्हा...

आघाडी सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे.
Praveen Darekar
Praveen DarekarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : नवाब मलिक हे देशद्रोही आहेत, असे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रतिप्रश्‍न विचारताच आपल्याच वक्तव्यावरून कोलांटीऊडी मारण्याची वेळ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आली आणि ‘‘मलिक देशद्रोही नाहीत, ज्यांच्याकडून जमीन घेतली ते देशद्रोही आहेत’’ असा खुलासा केला. पण दरेकरांच्या लेखी निवदेनात मलिक यांचा देशद्रोही असाच उल्लेख असल्याचे समोर आले. त्यावरून पुन्हा प्रश्‍न विचारताच ‘‘माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, मलिक देशद्रोहीच आहेतच’’ असे सांगत सारवासारव केली, पण पाच मिनिटात दोन वेळा भूमिका बदलण्याची नामुष्की दरेकरांवर आली.

Praveen Darekar
जयंत पाटील म्हणाले; आघाडीबाबत निर्णय अद्याप व्हायचायं

भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते. प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ते साधूसंत असल्यासारखे वातावरण राज्यातील सत्ताधारी करत आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत.केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. पण एकाही प्रकरणात भाजपचा हात नाही. उलट शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण केस दाबली हा सत्तेचा गैरवापर आहे.’’

Praveen Darekar
चित्रा वाघांचं शरद पवारांना साकडं; साहेब आता तुम्हीच लक्ष घाला !

नवाब मलिक प्रकरणात जनतेपुढे वास्तव यावे यासाठी आम्ही राज्यभर पत्रकार परिषद आहे. बाॅम्बस्फोटोतील आरोपींकडून १५ ते २० लाखाला नवाब मलिक यांनी ही जागा विकत घेतल्याने ईडीने त्यांना अटक केली. यात भाजप व केंद्राचा संबंध कुठेही संबंध नाही. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण सत्ता जाईल या भीतीने ठाकरे हतबल आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीने टीकेची झोड उठवली आहे. त्यावर दरेकर म्हणाले, ‘‘राज्यपाल कोश्‍यारी जे बोलले याचा विपर्यास केला जात आहे. त्यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे, अनादर केलेला नाही.’’

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com