Mohan Joshi : लोहगाव विमानतळ नवीन टर्मिनल मुद्य्यावरून मोहन जोशींचा भाजप नेत्यांसह मंत्री मोहोळांवर निशाणा, म्हणाले...

Mohan Joshi criticizes Murlidhar Mohol : भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धीचा सोस न करता प्रवाशांना सुविधा मिळतील याकडे लक्ष द्यायला हवे, असा टोलाही मोहन जोशींनी लगावला आहे.
Mohan Joshi | Murlidhar Mohol
Mohan Joshi | Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News: 'भाजपचे नेते लोहगाव विमानताळच्या नव्या टर्मिनलच्या निमित्ताने प्रसिद्धीचा सोस भागवून घेत आहेत. परंतु प्रवाशांना अद्यापही सुविधांपासून वंचितच रहावे लागत आहे.' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

विमानतळावरील गर्दी टाळणे आणि प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ व्यवस्था करून देणे यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले.

त्यानंतर मोहोळ यांनी टर्मिनलची पाहणी करून मोठा गाजावाजा केला. ऑगस्टमध्ये टर्मिनल कार्यान्वित झाले. अद्यापही प्रवाशांसाठी सुविधाच उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असे मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हटले आहे.

Mohan Joshi | Murlidhar Mohol
Manoj Jarange Patil : 'मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळा, कायद्याचा पट्टा घाला', ओबीसी नेता संतापला

विमानतळ टर्मिनलवर ॲपद्वारे नोंदणी केल्यावरही रांग न लावता प्रवेश करण्यासाठी डिजीयात्रा काउंटरची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. अन्य आऊटलेटचे काम झालेले नाही. सिक्युरिटी काउंटर्स आहेत. पण, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

Mohan Joshi | Murlidhar Mohol
NCP Leader : दादा अन् साहेब एकत्र येणे अशक्य! शरद पवार गटाच्या नेत्याने सांगितलं कारण

पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी फक्त दोन काउंटर्स उपलब्ध असल्याने रांगेत थांबावे लागते. हे टर्मिनल अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे. भाजपच्या (BJP) नेत्यांनी प्रसिद्धीचा सोस न करता प्रवाशांना सुविधा मिळतील याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com