Pune Congress on Pune Shivaji Nagar Bus stand : पुण्यातील शिवाजीनगर येथील बसस्थानकासाठी पुणे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी येत्या १५ दिवसांत स्थलांतरित केले जावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू.' असा इशारा माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे
शिवाजीनगर बसस्थानक लवकरात लवकर पूर्ववत सुरू व्हावे या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी(Mohan Joshi) यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन झाले होते. त्यानंतर महामेट्रोच्या खर्चात छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतला गेला.
या निर्णयालाही आता एक वर्ष होईल. परंतु, एसटी स्थानक पूर्वीच्याच जागी आणण्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही. याकरिता परिवहन खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा निर्णय काँग्रेस(Congress) पक्षाने घेतला आहे, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
'महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे २०१९ मध्ये स्थलांतर करण्यात आले. पुणे- मुंबई महामार्गालगत स्थलांतर झाल्याने वर्दळीच्या रस्त्यावर एसटी वाहतुकीची भर पडली. स्थलांतर तात्पुरते असल्याने वाहतुकीची गैरसोय सहन केली. मात्र महामेट्रोचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली, अद्याप शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत सुरू झालेले नाही, प्रवाशांना नाहक मनःस्ताप दिला जात आहे.'
तसेच 'यंदा तर, पावसाळ्यात स्थानकात आणि स्थानकाबाहेर पाण्याचे तळे साठले होते. त्यातून प्रवाशांना ये-जा करावी लागली. प्रवाशांची सहनशक्ती आता संपलेली आहे.', असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.