Shirur Lok Sabha : खासदार कोल्हेंची उमेदवारी निश्चित तर लांडगे निवडणूक प्रमुख ; आता आढळरावांचं काय होणार ?

Shivajirao Aadhalrao News : भाजपाचा आढळरावांच्या पायात पाय...?
Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pune : सलग तीन लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला धुळ चारणाऱ्या शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात थेट अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांना २०१९ ला मैदानात उतरवले होते. कोल्हे यांनी देखील आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत आढळरावांना पराभवाचा धक्का दिला होता. राष्ट्रवादीला तब्बल १६ वर्षांनी आढळरावांना पराभूत करणारा उमेदवार सापडला होता. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित मानली जात आहे.

याचदरम्यान, आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भाजपाने नुकतेच शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलं आहे. आधीच लांडगेंची शिरुरमध्ये उमेदवारीची शक्यता असताना त्यांचीच निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर भाजपाकडून नेमकं कोण लांडगे की आढळराव हा मोठा संभ्रम तयार झाला आहे.

Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Politics of Dombivli : शिवसेनेच्या वर्चस्वामुळे भाजपमध्ये 'असहकार्या'चे सूर; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीवरुन डोंबिवलीचे राजकारण तापले

शिरुर लोकसभा मतदारसंघातून २००४ पासून शड्डू ठोकुन उभे राहिलेले व खासदारकीची हॅट्रिक केलेले शिंदे सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव(Shivajirao Aadhalrao) सन २०१९ मध्ये पराभूत होवूनही पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात उभे ठाकलेली आहेत. राष्ट्रवादीपुढेही पुन्हा सन २०१९ सारखा उमेदवारीचा पेच उभा ठाकल्यानं विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी देण्याचे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलंय.

आता त्यातच भरात भर म्हणून की काय, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भाजपाने नुकतेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलेय. आधीच लांडगेंची शिरुरमध्ये उमेदवारीची शक्यता बोलली जात असताना त्यांनाच निवडणूक प्रमुख केल्याने भाजपाकडून नेमके कोण लांडगे की, आढळराव हा मोठा संभ्रम तयार झाला आहे.

Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Sanjay Raut On Upcoming Election: जे कर्नाटकमध्ये घडलं, तेचं महाराष्ट्रात घडणार..

लोकसभा २०२४ निवडणूकीच्या रिंगणातून जरा कोल्हेंनी बाहेर जाण्याची घोषणा करताच दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांना उमेदवारीचे आदेश दिल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला सुर बदलला आहे. पर्यायाने २०२४ लोकसभा कोल्हे विरुध्द आढळराव अशीच होणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र,आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भाजपाने नुकतेच शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलं आहे. यामुळे नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

भाजपाचा आढळरावांच्या पायात पाय...?

शिरुरमध्ये कोल्हे-आढळराव असे तुल्यबळ चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले असले तरी आढळराव यांना उमेदवारी शिवसेनेची की भाजपाची हे स्पष्ट होत नसल्यानं शिरुरमध्ये भाजपाकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याची चर्चा एव्हाना मतदार संघात चांगलीच रंगलीय. अशातच आता भाजपाने आणखी एक नियुक्ती बॉम्ब टाकीत आढळराव यांच्याच पायात पाय घातला. शिरुरमधून भाजपाकडून सर्वाधिक चर्चेत असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर शिरुर लोकसभा मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी टाकत त्यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
BJP Assembly Chief : भाजपची लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी; 288 मतदारसंघातील निवडणूक प्रमुख जाहीर

...आणि उबाळे-लांडेंनी सोडला सुटकेचा नि:श्वास !

महेश लांडगे(Mahesh Landge) यांची भोसरीवरील पक्की मांड राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडें आणि या मतदारसंघातून सेनेकडून प्रमुख इच्छुक असलेल्या सुलभा उबाळे यांचे राजकीय भवितव्यासाठी मोठे अडसर आहे. त्याचमुळे लांडे यांनी काही दिवसांपूर्वी शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितल्याची चर्चा होती.

आता मात्र लांडगे यांना भाजपा(BJP) ने थेट शिरुर लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केल्याने लांडगे हे हमखास शिरुरचे उमेदवार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम असा की, आता पुन्हा एकदा माजी आमदार विलास लांडे व शिवसेनेच्या प्रमुख इच्छुक सुलभा उबाळे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असणार हे नक्की असल्याची चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com