लक्ष्मण जगतापांना मावळातून लढायचयं? त्यावर खासदार बारणे म्हणतात...

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची मावळातून खासदार होण्याची इच्छा..
खासदार श्रीरंग बारणे
खासदार श्रीरंग बारणे सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : गेल्या तीस वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे स्वपक्षात किंवा विरोधकात माझ्यादृष्टीने माझा कुणीच विरोधक नाही. मुळात मी कुणाला विरोधक मानत नाही. सगळेच आपले आहेत, अशी माझी नेहमी भूमिका असते. निवडणुकीतही या संबंधांचा मला फायदा होतो.सर्वपक्षीय मित्र मला मदत करतात, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

दिवाळी निमित्त ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत खासदार बारणे बोलत होते.येत्या लोकसभा निवडणुकीला तुमच्यासमोर कोण उमेदवार असावा, असे वाटते या प्रश्‍नावर बोलताना खासदार बारणे म्हणाले, ‘‘ निवडणुकीला अडीच वर्षांचा काळ बाकी आहे. हा काळ मोठा आहे. त्यामुळे कुणासोबत लढत होईल, याची आज चर्चा करण्यात अर्थ नाही. मुळात निवडणूक कुणासोबत झाली तरी सर्वत्र माझे मित्र आहेत.कुणीही माझा विरोधक नाही, असे मी मानतो. त्यामुळे समोर कुणीही असले तरी मला विशेष काही वाटत नाही.’’

खासदार श्रीरंग बारणे
कारागृहातून सुटल्यानंतर काढलेली मिरवणूक आली अंगलट

तुमच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढून जिंकण्याची इच्छा आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. या संदर्भाने विचारले असता खासदार बारणे म्हणाले, ‘‘ इच्छा केवळ आपली असून चालत नाही. आपल्याला निवडून आणण्याची इच्छा जनतेची असावी लागते. त्यामुळे पंतप्रधान व्हावेसे वाटले तरी त्या पक्षाचे तेवढे खासदार निवडून यावे लागतात. हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्टय आहे.’’

मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना खासदार बारणे म्हणाले, ‘‘ या मतदारसंघातून कोणताही एक पक्षीय उमेदवार निवडून येऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा व मतदानकेंद्रनिहाय किती मते मिळू शकतील याचा अंदाज मी माझे नेते उद्धव ठाकरे यांना दिला होता. निकाल आल्यानंतर मी सांगितलेला अंदाज तंतोतंच खरा ठरला. मला माझ्या मतदारांबद्दल पूर्ण विश्‍वास होता.आजही या मतदारसंघाचा मला पूर्ण अभ्यास आहे. त्यामुळे कोणताही एकट्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही.’’

खासदार श्रीरंग बारणे
पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार; पण…

पक्षातल्या गटबाजीबद्दल विचारले असता, खासदार बारणे म्हणाले, ‘‘ माझ्या पक्षात गट-तट नाही.प क्षात माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच गट आमच्या पक्षात आहे. गट-तट करणाऱ्यांना आमच्या पक्षात स्थान मिळत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या अनेक चांगल्या लोकांन संधी दिली आहे.``

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com