Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणात नेते गर्दी करत आहेत. शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सोशल मीडिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, सोशल मीडिया शिबिर घेण्याची
कार्यकर्त्यांची इच्छा होती. दोन तीन महिन्यांनी अशी शिबिर घेत असतो. आमचा राजकीय पक्ष आहे जो विचारधारेने चालतो पॉलिसी लेवलला सरकार काय निर्णय घेत त्याचे प्लस पॉइंट मायनस पॉईंट देशात राज्यात होणाऱ्या गोष्टींवर मनमोकळी चर्चा या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र (NCP) पक्षांमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते इच्छुक आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत. एक वर्षांपूर्वीं पक्ष कुठे होता, चिन्ह कुठे होतं, आमदार, खासदार जे जी सत्तेची पद होती त्यातील पक्ष चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी परंतु सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली. कारण मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असं होत की ती दिल्लीवरून काहीही करू शकते परंतु या राज्याने दाखवून दिलं की हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असं सुप्रिया सुळे म्हणल्या.
पक्ष सोडून गेलेले आमदार नेते आपल्या संपर्कात आहेत का आणि आगामी काळात ते पक्षप्रवेश करणार का याबाबत उत्तर देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, जे दीड वर्षापूर्वी पक्ष सोडून गेले त्यांच्यासाठी माझा फोन इनकमिंग साठी सदैव चालू असतो, मी कोणालाही ब्लॉक केलं नाही. ही वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई नाही ते बोलणे सर्वांशी सुरू होते कधीही संबंध तोडले नाही असं सुप्रिया सुळे म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावरती सुप्रिया सुळे म्हणाल्या, अतिथी देवो भव पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही आम्ही संविधान वाले आहोत, संविधान केंद्र बिंदू ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. मात्र अमित शाह महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांना रोख उद्धवजींना रोख आणि वेळ पडली तर पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा आणि कशीही करून सत्ता आणा असे म्हणतात. भाजप जुना पक्ष आहे तरीही आजही त्यांच्या पक्षात आज ही टॅलेंट दिसत नाही. त्यामुळे ते इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे येतात. तेव्हा सत्ता येते चांदीच्या ताटात जेवण्याची वेळ येते तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला बसून बाहेरून आलेले जेवणासाठी बसतात असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.