Supriya Sule : दोनशे आमदारांच्या सरकारने आरक्षणावर तोडगा काढावा, खासदार सुळेंची अपेक्षा

Maratha Vs Obc Reservation : सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असलेल्या संघर्षाला सर्वस्वी सरकार जबाबदार असून सरकारची ध्येयधोरणे याला कारणीभूत ठरली आहेत.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Pune News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाल आहे. इकडे मराठा समाजाकडून होत असलेल्या मागण्या आणि त्याला ओबीसी समाज कडून होत असलेला विरोध यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

पुणे दौरा वरती असताना सुप्रिया सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माध्यमांशी संवाद साधला. सरकारचे शिष्टमंडळ ओबीसी आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास गेला आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उशिरा का होईना या सरकारला जाग आली आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षांपूर्वी आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये हे करू असं बारामतीतुन भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होत. परंतु गेले दहा वर्षे सातत्याने सरकार आम्ही हे करू असं सांगत असलं तरी प्रत्यक्षात काही झालेलं नही.

Supriya Sule
Nana Patole News: लोकसभेनंतर नानांचा बदललाय बाणा..! म्हणाले, पवारसाहेबांनी एक पाऊल मागे घेतले असेल तर आम्ही...

गेले दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे.आता नंबर कमी झाले असले तरी दिल्लीत आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बदला संदर्भातील ठरवा त्यांनी मांडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष त्याच्या बाजूने ठामपणे उभा राहील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी सुरू असलेल्या संघर्षाला सर्वस्वी सरकार जबाबदार असून सरकारची ध्येयधोरणे याला कारणीभूत ठरली आहेत. हे अतिशय असंवेदनशील हे सरकार असून त्यांना फक्त घर फोडा आणि पक्ष फोडा इतकंच येत असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

ओबीसी (OBC) आंदोलना संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणीही आंदोलन करत असेल तर संवेदनशील असलेल्या सरकारने त्याच्याशी चर्चा करून चर्चेतन मार्ग काढणं आवश्यक आहे. या सरकारकडे दोनशे आमदार आहेत. त्यामुळे आरक्षणासंदर्भात मार्ग निघणे आवश्यक आहे. इच्छा असेल तर ते क्रांती घडू शकतात मात्र त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Supriya Sule
Video Pankaja Munde : हाकेंचं उपोषण स्थगित होताच पंकजा मुंडेची मोठी मागणी; म्हणाल्या,'जातनिहाय जनगणना..'

एकीकडे सरकारने संगे-सोयरे बाबत जरांगे यांना आश्वासन दिला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या व्यासपीठावर मात्र ही सरकार वेगळी भूमिका घेत आहे.याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की या सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार दोघांनाही फसवत आहे. वेगळं नेत्यांकडून वेगवेगळी विधान ऐकायला मिळत आहेत अशी टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणायचे हे सरकार अंतर्गत वादाने पडेल पण ते त्यामुळं नाही तर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी (ICE) मुळे पडले परंतु सध्या त्यांच्या सरकारमध्येच अंतर्गत वाद सुरू आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com