Supriya Sule: सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना पत्र; तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती

MP Supriya Sule letter to dcm Devendra Fadnavis: महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.
MP Supriya Sule letter to dcm Devendra Fadnavis
MP Supriya Sule letter to dcm Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून एक विनंती केली आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, असे सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना राज्य सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. राज्यात पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे सुळे यांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस पवार सरकार निदर्शनास आणून दिले आहे. सुळे यांनी एक्सवर फडणवीस यांनी विनंती करुन आपली सुरक्षा व्यवस्था तातडीने काढून घ्यावी, अशी विनंती केली आहे.

राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे, असा सल्ला सुळे यांनी सरकारला दिला आहे.

MP Supriya Sule letter to dcm Devendra Fadnavis
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना आता आदिवासींची साथ? तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार

सुप्रिया सुळे म्हणतात

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com