Supriya Sule: लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं...; सुप्रियाताईंसाठी पवार बारामतीत तळ ठोकणार

Maharashtra Politics: पक्षाला बळ देण्यासाठी पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार
Baramati Lok Sabha Constituency News
Baramati Lok Sabha Constituency News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. बारामती नेमकी कोणाची, यावरून दोन्ही गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचे संघर्ष पाहायला मिळत आहे.

आगामी लोकसभा निवडणूक जिंकून बारामती मतदारसंघावर आपलं वर्चस्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघामध्ये भेटीगाठी, मेळावे, उद्घाटन यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच आता खुद्द शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरणार असून, चार दिवस ते बारामतीमध्ये तळ ठोकून असणार आहेत.

विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. 'घड्याळ' हे चिन्हही अजित पवार गटाला बहाल करण्यात आले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही गटांमध्ये मतदारसंघातील वर्चस्वची लढाईला पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना 'काही लोक येतील आणि ही त्यांची शेवटची निवडणूक असल्याचं सांगून भावनिक आवाहन करतील. मात्र, तुम्ही त्याला बळी पडू नका, असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं. त्यामुळे बारामतीच्या आखाड्यामध्ये स्वतः शरद पवार निवडणुकीसाठी उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, या चर्चांना पूर्णविराम देत शरद पवारांनी अजित पवारांचे वक्तव्य खोडून काढले.

Baramati Lok Sabha Constituency News
Kolhapur Politics: चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूर काँग्रेस मजबूतच, महायुतीला देणार फाइट

मी यापूर्वीच निवडणूक लढणार नाही, याबाबत जाहीर केलेला आहे. त्यामुळे मी भावनिक आव्हान करण्याची आवश्यकता नाही. तरी बारामतीतील लोक शहाणे आणि समजदार आहेत. वर्षानुवर्षे त्यांची कामे कोणी केली, त्यांची प्रतिष्ठा कोणी वाढवली आहे हे ते जाणतात, त्यामुळे बारामतीकर योग्य निर्णय घ्यायला समर्थ असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, बारामती मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार 15 फेब्रुवारीपासून सलग चार दिवस शरद पवार हे स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून राहणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला बळ देण्यासाठी पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आढावा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी बारामतीत आढावा बैठक घेणार आहेत, तर दुसऱ्या दिवशी १६ फेब्रुवारीला दौंड मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. १७ फेब्रुवारीला शरद पवार इंदापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. १८ फेब्रुवारीला पुरंदरला जाहीर सभा होणार आहे, तर १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर हा दौरा असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुळे या खऱ्या अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अॅ क्टिव्ह झाल्या आहेत. त्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर दुसरीकडे गेल्या महिनाभरातच सुनेत्रा पवार यांनी विवाह सोहळे, क्रीडा महोत्सव, गावच्या यात्रा, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात दर्शन, ध्वजारोहण समारंभ अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. यात बारामती तालुक्याच्या बरोबरीनेच पुरंदर, इंदापूर या भागाचाही दौरा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या होणाऱ्या दौऱ्याला अत्यंत महत्त्व आले आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Baramati Lok Sabha Constituency News
Sanjay Raut Latest News : चव्हाणांनी स्वत:चे बारा वाजवून घेतले, शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच ते काँग्रेस सोडणार होते...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com