Supriya Sule News: भाजपने माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवलं...

Baramati Lok Sabha 2024: आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागत आहे. मोठी वहिनीही आईच्या समान असते. माझ्यावरती जे संस्कार झालेत त्यानुसार मोठ्या भावाची बायको ही आई समान असते.
Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Supriya Sule Vs Sunetra Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha 2024) निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून देखील सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात (Supriya Sule Vs Sunetra Pawar) उतरवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती मध्ये नणंद विरोधात भावजय अशी लढत होणार असल्याचे निश्चित झालेला आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रसिद्धी माध्यमांची संवाद साधला.सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीकडून मला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. याबाबत मी त्यांचे आभार मानत असून बारामती मतदारसंघातील लोकांचे देखील आभार मानते आणि मला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी विनंती बारामतीतील लोकांना करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई ही व्यक्तिगत नसून वैचारिक आहे भाजपच्या चुकीच्या ध्येय धोरणाबाबत माझी ही लढाई आहे. देशामध्ये भाजपाकडून दडपशाहीचा वातावरण निर्माण करण्यात आला आहे. देशात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवरती आगामी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या जाणार आहे. सध्या देशामध्ये इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे.हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. बारामती मतदारसंघाचा विचार केला तर पाणी प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावलं अत्यंत महत्त्वाचा असल्याचा असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule Vs Sunetra Pawar News
Hingoli Lok Sabha 2024: हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद, विजयासाठी संघर्ष अटळ..

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार सोबत नसल्याने तुमचं खासदारकीचे लीड कायम राहणार का ? असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी लीड साठी निवडणूक लढवत नसून मी जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढते. भाजपचे नेते बारामती मधून येऊन विकासाच्या गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला पवारांचा पराभव करायचाय अशी वक्तव्य करत आहेत. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागत आहे. मोठी वहिनीही आईच्या समान असते. माझ्यावरती जे संस्कार झालेत त्यानुसार मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. भारतीय जनता पक्षाने माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवला असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

सावरकर हा चित्रपट राहुल गांधी पाहणार असतील तर मी पूर्ण थेटर बुक करायला तयार आहे, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी तेच पैसे जर पाण्याचे टँकर पुरवण्यासाठी केलं तर त्याचा फायदा या राज्यातील गरीब कष्ट करणाऱ्या जनतेला होईल. असा टोला फडणवीसंना लगावला.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com