Mumbai Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याचाही सूर होता. पण अजित पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे आणि त्यांना डेंग्यूचे निदान झाल्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम तुर्तास तरी पुढे ढकलले असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. पण प्रसारमाध्यमांना मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कालपासून त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. (Maratha Reservation) अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत.त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली की ते संपूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेत दाखल होतील." असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यूचे वाढते रुग्ण आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांच्यावर सध्या घरातूनच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण दुसरीकडे त्यांच्या नाराजींच्याही चर्चा सुरू झाल्या. अजित पवार काल बारामती दौऱ्यावर जाणार होते. पण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा समाजाने लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांचाही बारामती दौरा रद्द झाला. सकल मराठा समाजाने त्यांच्याही दौऱ्याला विरोध केला होता.
अजित पवार शनिवारी (ता. २८) दुपारी एक वाजता माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र इतरांप्रमाणे त्यांनाही गावबंदीचा फटका बसल्याचे दिसत आहे. मराठा समाजाची आक्रमकता पाहून त्यांनी बारामती बारामती दौरा रद्द केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.